Dr. Bharti Pawar, Bhaskar Bhagare esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : तुतारी वाजणार की कमळ फुलणार? निफाड मतदारसंघात आकडेमोडीचे दावे-प्रतिदावे

सकाळ वृत्तसेवा

एस.डी.अहिरे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या डॉ. भारती पवार यांचे कमळ फुलणार की महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांची तुतारी वाजणार आणि यावरून दावे- प्रतिदावे सुरू झाले आहेत. दरम्यान, यावेळी विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर पडणार याविषयी संपूर्ण तालुक्याला उत्सुकता लागली आहे. (Nashik Dindori Lok Sabha Constituency)

गत तीनही निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत मताचा टक्का एवढा वाढला आहे की, अगदी ग्रामपंचायतीच्या तोडीचे मतदान झाले आहे. भाजपला जोरदार धक्का बसण्याची निर्णायक आघाडी घेत भगरे हे जॉईट किलर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिंडोरी लोकसभेच्या केंद्रस्थानी यंदाही निफाड मतदारसंघ राहीला. निफाडमध्ये शरद पवार यांची सभा घेऊन महाविकास आघाडीने अगोदरच मुसंडी मारली होती. त्यात कांद्या निर्यातबंदीसह केंद्र शासनाच्या शेती विरोधी धोरणाची धग शेतकऱ्यांच्या मनात कायम राहीली. मोदींचा करिश्‍माही बराचसा ओसरल्याचे दिसून आले.

याउलट निफाड मतदारसंघात ग्रामीण भागात तुतारीची अक्षरश: लाटच आल्याचे चित्र दिसत होते. तर पिंपळगांव बसवंत, ओझर, निफाड अशा शहरात मात्र कमळाला साथ मिळाल्याचे चित्र आहे. मात्र मुस्लीम मतदारांनी तुतारीलाच पसंती दिल्याने शहरातील भाजपच्या मताधिक्याला मोठा ब्रेक बसण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

वधारलेला टक्का ठरणार दे धक्का!

निफाड मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील गर्दी पाहता ही निवडणुक लोकसभेची आहे की ग्रामपंचायतीची असा प्रश्‍न पडत होता. सकाळपासून मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगा भऱउन्हातही कायम राहील्या.शिवाय सायंकाळपर्यत मतदानाचा ओघ टिकून राहीला. काही गावांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का वाढला.

निफाड मतदारसंघात ६४.३१ टक्के एवढे आजपर्यत कधी न झालेले विक्रमी मतदान झाले. वधारलेला टक्का ॲन्टीइन्कमबन्सी असते, असा कयास लावला जातो. तसेच घडल्यास भाजपचा बुरूज येथे पूर्णत: ढासळणार आहे. किमान २० ते २५ हजार मतांची आघाडी भास्कर भगरे हे निफाड मतदारसंघातून घेऊन जातील, असा कयास बांधला जात आहे.

मताधिक्क्याचे शिल्पकार ठरणार कदम

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निफाडच्या राजकीय पटलावर माजी आमदार अनिल कदम यांचा बोलबाला राहीला. थेट बांधावर जात त्यांनी तुतारीचा आवाज घुमविला. शरद पवार यांचा विश्‍वास त्यांनी या निमित्ताने मिळविला. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा भ्रमणध्वनी येऊनही निडरपणे त्यांनी भगरे यांना कारमध्ये फ्रंट सीट बसवून स्वत: सारथ्य केले.

खरे तर निफाडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची व कॉंग्रेसची ताकद तोळामासा आहे. परंतु कदम यांच्या गटाची ताकद भगरे यांना बारा हत्तीचे बळ देऊन गेली. त्यामुळे निफाडच्या मताधिक्यात कदम हे शिल्पकार ठरू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीची मशागत अनिल कदम यांनी करून घेत तुतारीच्या ॲक्शनने जिल्ह्याभरात ते चर्चेत आले आहेत.

मोदी, मुंडे यांची सभे दिला टेकू ...

कांद्याच्या प्रश्‍नावरून रान उठलेले असताना प्रारंभी भाजपाच्या डॉ.भारती पवार यांना रोषाला सामोरे जावे लागले. पण पिंपळगांव बसवंत येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने वातावरण काहीसे निवळण्यात यशस्वी झाले. तर सायखेडा येथे पंकजा मुंडे यांनी सभा घेऊन वंजारी समाजाची मते भाजपकडे वळविण्यात काही प्रमाणात यश आले.

त्यामुळे भास्कर भगरे यांना मिळणाऱ्या मताधिक्क्यात घट होऊन डॉ.पवार यांना टेकू मिळाल्याचे चित्र आहे. परंतु महायुतीचे घटक पक्ष निफाडमध्ये एकजुटीने अन्‌ ताकदीने लढतांना दिसले नाहीत. परिणामी, त्याची झळ डॉ.पवार यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- निफाड मतदारसंघातील मतदारसंख्या - २,९१,४५९

- झालेले मतदान- १,८७,४२५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT