Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

Lok Sabha Constituency : नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या पाऊण टक्यांची वाढ झाली असली तरी यंदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान नांदगावला झाले.

संजीव निकम,नांदगाव

नांदगाव : चार वेळा सलग भाजपाला मताधिक्य देणारा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या पाऊण टक्यांची वाढ झाली असली तरी यंदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान नांदगावला झाले. अर्थात त्याला स्थानिक मुद्यांची किनार होती. या निवडणुकीत स्थानिक मुद्यांबाबत मतदारांमध्ये रोष कायम असल्याचे दिसून आले. (Nashik Lok Sabha Constituency)

त्यामुळे या मतदारसंघात नेमके कोणाचे मतदान घटणार व कोणाचे वाढणार याबाबत जनतेच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. तुटलेल्या जनसंपर्कामुळे डॉ. भारती पवारांसाठी निवडणूक आव्हानात्मक होती. त्यातच आमदार सुहास कांदे यांनी संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा आपल्या हातात घेतल्याने डॉ. पवारांची बाजू सावरली गेली आणि शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंढे यांच्या सभेने नाराजी बऱ्यापैकी भरून निघाली.

महायुतीचा किल्ला एकहाती लढविणाऱ्या आमदार सुहास कांदे यांनी यंदाची निवडणूक 'माझ्या बहिणीची’ असल्याची भावनिक साद घातल्याचा परिणाम काही प्रमाणात दिसला. सर्वात कमी मतदान झाल्याने नांदगावमधून डॉ. भारती पवारांना मिळणारे मताधिक्य नेमके किती असेल याचे कोडे मात्र प्रत्यक्षात निकालानंतर उलगडेल.

चुकलेल्या आरेखनामुळे बारमाही बनलेल्या रेल्वेच्या सबवेची अडचण केंद्राच्या दुष्काळी धोरणातून वगळण्यात आलेला तालुका, रेल्वे प्रवासी गाड्यांचे थांबे, कांदा निर्यातबंदी आदी स्थानिक मुद्यांवर जनतेत मोठा रोष दिसून आला. दुसरीकडे महायुतीत असूनही एकत्रित प्रचारात सहभागी न होता भुजबळ समर्थकांनी प्रचारयंत्रणेत आपली स्वतंत्र चूल मांडली होती, त्यावरही आरोप-प्रत्यारोप झाले. दुसरीकडे यंदा स्थानिक भाजपच्या मंडळीत यंत्रणा ताब्यात ठेवण्यावरून सुंदोपसुंदी जाणवली. (latest marathi news)

आमदार कांदे यांच्या दृष्टीने निवडणूक डॉ. भारती पवारांची असली तरी नजिकच्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची ही एक चाचणी होती. त्यामुळे त्यांनी बुथनिहाय व्यवस्थापन कौशल्य दाखविले. महाआघाडीच्या भास्कर भगरे यांनी स्थानिक प्रश्नांना हात घालत सलग पंधरा वीस वर्षे मताधिक्य देणाऱ्या नांदगावसाठी केलेल्या विकास कामांचा हिशोब मागितला.

केंद्रात मंत्री होऊनही त्याचा कोणता लाभ नांदगाव मतदारसंघाच्या वाट्याला आला, अशा पद्धतीने कोंडी केली व त्यांच्या युक्तिवादाचा परिणाम बऱ्यापैकी जाणवला. थेट भिडणारे वास्तव भास्कर भगरे यांनी रेखाटले व त्यांच्या या भावनिक आवाहनाला ग्रामीण भागासह मनमाड, नांदगावमध्ये प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील दुष्कळाच्या प्रश्नांवर त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उपोषणे, आंदोलने केली असल्याने श्री. भगरे यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरली.

याउलट आपल्या बचावासाठी देशभ्रमण करीत असल्याने वेळ कमी पडला हा कबुलीजबाब देणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे व्हिजन, राममंदिर, ३७० कलम, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची उंचावलेली मान, सुरक्षीत सीमा, आयुष्मान भारत या देशपातळीवरील प्रश्नांवर प्रचार आणि मोदींच्या नावे मते मागितली.

याउलट ‘रामकृष्ण हरी’ असे अभिवादन करीत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदार संघातील ग्रामीण भाग पिंजून काढण्यात पुढे असलेल्या भास्कर भगरे यांना शिक्षक , शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती दिसून आली. याउलट दुष्काळ शेतकरी नाराजी व मराठा आरक्षण या दोन्ही मुद्यांवर ग्रामीण भागात डॉ. भारती पवारांचा कमी होणारा मतांचा टक्का यावेळी किती खाली घसरतो.

याविषयी उत्सुकता आहे. मताधिक्य कायम मात्र त्यातील घसरण अशी स्थिती मतदानानंतरची आहे. भारती पवारांना नांदगाव मतदारसंघात मिळणाऱ्या आघाडीमुळे अन्य ठिकाणी त्यांचे गणित किती व कसे बिघडणार हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे

एकूण मतदान

३,३२,५१२

झालेले मतदान

२०१९ : १,८१,४८७

२०२४ : १,७२,०९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT