Dr. Bharti Pawar, Harishchandra Chavan  esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरीत भाजपला धक्का; हरिश्‍चंद्र चव्हाण यांची बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीची डोकेदुखी वाढली असून, भाजपचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांच्या अपक्ष उमेदवारीने भाजपासह महायुतीला धक्का बसला आहे. मी भाजपचा प्रामणिक कार्यकर्ता मात्र, मला पक्षाने विचारले नाही व विश्वासात घेतले नाही. (Dindori Lok Sabha Constituency)

त्यामुळे मतदारसंघातील जनतेच्या आग्रहाखातर निवडणूक लढवत आहे, माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी निवडणूक लढणारच असल्याचे माजी खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर विश्वास टाकत त्यांना रिंगणात उतरविले आहे.

भाजपने डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्याने माजी खासदार चव्हाण नाराज झाले होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखविली होती. यातच, त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून समर्थक, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची घोषणा केली होती. यातच, चव्हाण यांनी कळवण येथे डॉ. पवार यांच्यावर टिकास्त्र सोडत, पाच वर्षात माझी आठवण झाली नाही.

आता अडचणीत आल्यावरच माझी आठवण झाली का असा सवाल केला होता. तसेच डॉ. पवार यांच्यावर नाराजी असल्याने त्यांची उमेदवारी बदलण्यात यावी अशी मागणी देखील केली होती. मात्र, पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. अखेर, माजी खासदार चव्हाण यांनी गुरूवारी (ता.२) अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. (Latest Marathi News)

अर्ज दाखल झाल्यानंतर, परशुराम सायखेडकर नाट्यगृहात समर्थकांचा मेळावा घेत त्यांच्याशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या आग्रह व जनरेट्यामुळे उमेदवारी करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मतदारसंघात पक्षाची ताकद नसताना तळागाळात जाऊन काम केले. सामान्यांसाठी सतत काम करीत राहिलो.

मतदारसंघातील कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात खासदारांच्या कामातील फरक सामान्यांना दिसून आला. त्यामुळेच मला उमेदवारीसाठी आग्रह झाला असून, शेतकरी व सामान्यांसाठी ही उमेदवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्यावर केवळ जनरेटा व शेतकऱ्यांसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली.

परंतु १९९५ ची अपक्ष निवडणूक जिंकण्याची पुनरावृत्ती लोकसभेत चव्हाण करतील असा आशावाद बैठकीत सर्मथकांनी बोलून दाखविला. यावेळी प्रा.अशोक बागुल, विनोद जाधव, पोपटराव आहिरे, पवन आहिरराव, चंद्रकांत वाघ, संजूबाबा कावळे, लक्ष्मण जाधव, कलावती चव्हाण, वैभव कावळे, हनुमंत सानप, आनंद गावीत, समीर चव्हाण, बापू पाटील, विनायक खालकर, संजय कानडे आदी उपस्थित होते.

डॉ. पवार यांच्याकडून मनधरणी

दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार दिनेश शर्मा यांनी माजी खासदार चव्हाण यांच्याशी चर्चा करीत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनीही चव्हाण यांची भेट घेत, त्यांच्याशी चर्चा केली. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर, डॉ. पवार यांनी त्यांची भेट घेत, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू, चव्हाण उमेदवारीवर ठाम राहिले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT