नाशिक : राजकारणातील भाऊबंदकी हा विषय निवडणुकांच्या काळात आणखी चर्चेला येत असतो. नाशिक जिल्ह्यातही स्व. ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी हा स्थानिक पातळीवरील चर्चेचा विषय असला, तरी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज त्यांचे दीर आमदार नितीन पवार व जाऊबाई जयश्री पवार यांच्या भेटीला गेल्या. (Union Minister of State Dr. Bharati Pawar visited MLA Nitin Pawar)
त्यावेळी राजकीय वादावर पडदा टाकून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मनोमीलन करण्याचा प्रयत्न केला. या राजकीय मनोमिलनातून महायुतीच्या दिंडोरी लोकसभा उमेदवार डॉ. भारती पवार यांनी बेरजेचे राजकारण करून कळवणमधील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जात आहे.
अर्थात या राजकीय मनोमिलनाचा कितपत फायदा होईल, हे बघण्यासाठी चार जूनची वाट बघावी लागणार आहे. राज्याचे माजी मंत्री (स्व.) ए. टी. पवार यांनी कळवण तालुक्याचे ३५ वर्ष नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात कुटुंबात राजकीय संघर्ष सुरू झाला. कळवण मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आणि भाजप खासदार डॉ. भारती पवार हे सख्खे दीर-भावजय.
मात्र, त्यांच्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपासून वादंग सुरू झाले. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतील तिकीट वाटपावरूनही यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. सन २०१९ मध्ये हा संघर्ष अगदीच टोकाला गेला. त्यामुळे डॉ. पवार यांनी राष्ट्रवादी सोडत, भाजपत प्रवेश केला. त्यानंतर, त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. (latest marathi news)
यानंतर, मतदारसंघात वर्चस्वावरुन त्यांच्यात संघर्ष सुरू झाला. तेव्हापासून पवार कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या कौटुंबिक संघर्षामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी अडचण होत होती. महायुती होऊनही दोघांमधील संघर्ष मिटण्याची चिन्हे नव्हती. आमदार नितीन पवार यांची मतदारसंघात महत्वाची भूमिका आहे.
यामुळे कळवणमधून मताधिक्य मिळवण्यासाठी नितीन पवार यांच्याशी जुळवून घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबातील वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेत डॉ. भारती पवार यांनी आमदार नितीन पवार यांची भेट घेत चर्चा केली. तब्बल दोन तास झालेल्या या कौंटुबिक भेटीत चर्चा करीत एकमेकांबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे त्यांच्यात मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या मनोमिलनाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा होईल का हे प्रत्यक्ष मतदानातूनच स्पष्ट होईल. यासाठी ४ जूनच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मतभेद होते, मनभेद नाही
"खूप दिवसांनी भेट झाली. आमच्यात कुटुंबात कोणतेही वाद नव्हते. मतभेद होते. मनभेद नाही. ते मोठे आहेत, माझ्याकडून कळत न कळत काही चुकले, काही गैरसमज निर्माण झाले ते चर्चेतून आता दूर झाले आहेत. कळवण-सुरगाण्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत." - डॉ. भारती पवार (केंद्रीय राज्यमंत्री)
"आमचे काही राजकीय मतभेद होते. पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच होतो. विकासासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत." - नितीन पवार (आमदार, कळवण-सुरगाणा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.