Bhaskar bhagare Rally esakal
नाशिक

Dindori Lok Sabha: सरकारला लाल कांद्याची नव्हे; पांढऱ्या कांद्याची चिंता! रॅलीद्वारे भास्कर भगरे यांनी दिंडोरीतून दाखल केला अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Dindori Lok Sabha Costituency : गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिली. त्यामुळे सरकारला लाल कांद्याची नव्हे; तर पांढऱ्या कांद्याची चिंता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तर, महाराष्ट्र सरकारही गुजरातसाठी काम करत आहे, गुजरातला कांदा निर्यातील दिलेली परवानगी हा आचासहिंतेचा भंग नाही का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी सोमवारी (ता.२९) रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. (Nashik Dindori Lok Sabha constituency election 2024 Bhaskar Bhagare news)

सकाळी गोल्फक्लब मैदानाजवळील इदगार मैदानावर जवळ दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले. दुपारी १२ वाजता प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आगमन झाल्यानंतर, भगरे यांच्या रॅलीस प्रारंभ झाला. हातात झेंडे, डोकयावर पक्षाच्या टोप्या घालत घोषणाबाजी करत रॅली त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, गंजमाळ मार्गे शालिमार येथील शिवसेना कार्यालयाावर पोहचली.

रॅली पोहचली, त्यावेळी महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजाभाऊ वाजे यांची प्रचार रॅली पुढे निघून गेली होती. त्यामुळे उमेदवार भगरे यांची रॅली शिवसेना भवनावर काही काळ थांबून राहिली. त्यानंतर काही वेळेनंतर पुन्हा रॅलीस सुरूवात झाली. शालिमार, नेहरू गार्डन मार्गे रॅली महात्मा गांधी रोडवर दाखल झाली. रॅलीने त्यावेळी उमेदवार वाजे यांच्या रॅलीची प्रतिक्षा केली.

मात्र, रॅली येईना म्हणून दिंडोरीतील भगरे यांची रॅली थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली दाखल झाल्यानंतर, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गुजरातमधील कांद्याला निर्यातीस परवानगी दिल्यानंतर, महाराष्ट्रातील शेतकरी चिडला. त्यावेळी घाईघाईने केंद्र सरकारने

कांदा निर्यातीला केंद्र सरकारने दिलेली परवानगी जुनीच असून, नवीन कोणतीही परवनागी दिलेली नाही. ९९ हजार ५०० मेट्रीक टन कांदा सहा देशात निर्यात करावयास दिल्याचे सांगत, केंद्र सरकार दिशाभूल करत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे, गणेश धात्रक, माजी आमदार कल्याणराव पाटील, रामदास चारोस्कर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, भास्कर गावित, चिंतामण गावित, दिलीप मोरे, राजेंद्र मोगल, रवींद्र देवरे, डॉ. सयाजी गायकवाड, प्रविण जाधव, माणिकराव शिंदे, संगिता पाटील, अनिता दामले, शाम हिरे, तुषार जाधव, तोशिब मनियार, संतोष हिरे, राजाभाऊ ढगे, जयदत्त होळकर, प्रकाश पिंगळे, वाळू जगताप, गुलाब जाधव, जयेश पोकळे, भारती देशमुख, प्रदीप गायकवाड, दामोदर राऊत, पुंडलीक महाले, विलास अलबाड, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

माकप उमेदवारीला भाजपची रसद

दिंडोरीतील माकप उमेदवारीवर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाष्य केले. माकपने उमेदवारीचा हट्ट केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चर्चा केली. मात्र, ते उमेदवारीवर ठाम राहिले. माकपची उमेदवारी ही केवळ महाविकास आघाडीचे मते खाण्यासाठी आहे.

त्यांच्या उमेदवारीचा कंट्रोल दुसरीकडे असून त्यांना भाजपकडून रसद पुरविली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आघाडीचा माकप उमेदवारीला पाठींबा नाही. माकप उमेदवाराच्या पत्रकावर इंड़िया आघाडीच्या नेत्यांचे फोटो छापून ते दिशाभूल करीत आहे. याबाबत, निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

रॅलीत महत्वाचे

- रामकृष्णहरी वाजवा तुतारीचा रॅलीत जयघोष

- कांद्याची माळ घालून कार्यकर्ता रॅलीत सहभागी

- शिवसेना कार्यालयावर रॅलीला करावी लागली प्रतिक्षा

- महाविकास आघाडी उमेदवारांची रॅली मागे-पुढे

- रॅलीतील कार्यकर्त्यांना पाण्याची व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT