Unsanitary spread on the ground esakal
नाशिक

Nashik News : गांधीनगर क्लब परिसरात घाणीचे साम्राज्य

Nashik : गांधीनगर क्लब ग्राउंड परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खासगी व मोकाट जनावरांमुळे परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गांधीनगर क्लब ग्राउंड परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खासगी व मोकाट जनावरांमुळे परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे. सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी येणारे मुले सर्वप्रथम जनावरांचे मलमूत्र संपूर्ण मैदानावर पसरलेले असताना ते स्वच्छ करतात आणि त्यानंतर खेळतात. (Nashik Dirt in Gandhinagar club area )

गांधीनगर परिसरात केंद्रीय बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय, होमगार्ड ऑफिस, नाशिक मर्चंट बँक, लेखा विभाग, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दवाखाना, केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांची निवासस्थाने अशा अनेक महत्त्वाच्या आस्थापना आहेत. पण तरीही येथील स्वच्छता करण्यासाठी प्रशासनातर्फे कुठलीही उपाययोजना केली जात नाही. मोकाट जनावरे, डुकरे यांचा सर्रास होणे येथे वावर असतो.

त्यांच्या घाणीने संपूर्ण दुर्गंधीमय झाला आहे. परिसरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नागरिकांची रेलचेल असते. सकाळी तर मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुष येथे वॉकिंग करण्यासाठी येतात. तसेच शेजारी फुटबॉल ग्राउंड, अटल बिहारी वाजपेयी उद्यानात ग्रीन जीम आहे. त्यामुळे येथे सकाळी व सायंकाळी नियमित फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. (latest marathi news)

यामध्ये अनेक शासकीय खात्यात विविध ठिकाणी सेवा बजावलेले मोठ्या पदावरील अधिकारी सुद्धा आहे. तरीही या परिसरात स्वच्छतेसाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सायंकाळ नंतर या परिसराचा वापर टवाळखोरांकडून दारू पिण्यासाठी होत आहे. विशेष म्हणजे याच परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी आहे.

''गांधीनगर ग्राउंड परिसरात अनेक नागरिक सकाळ व सायंकाळी सुदृढ आरोग्य राहावे यासाठी नियमितपणे येत असतात. विशेष करून वॉकिंग करताना अनेक ठिकाणी घाणीमुळे दुर्गंधी जाणवते. तसेच वॉकिंग करताना रस्त्यावरच बऱ्याच ठिकाणी घाण पडलेली असते. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेकडून स्वच्छता केली जाते. या परिसरातही व्हावी अशी अपेक्षा आहे.''- मिलिंद पाटील, मॉर्निंग ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT