निफाड : उगांव (ता. निफाड) येथील हनुमान मंदिर जिर्णोद्धाराच्या कामावरून वाद निर्माण झाला असून जिर्णोद्धार पायाभरणी होताच मंदिर उभारणीच्या जागेबाबत बाळासाहेब पानगव्हाणे आणि हनुमान मंदिराचे यापुर्वीच्या जागेवर सुरु असलेले जिर्णोध्दाराचे कामकाजास कोणीही विरोध न करता मंदिर निर्विघ्न उभे करावे या मागणीसाठी भगवान पानगव्हाणे यांनी उपोषण सुरु केले आहे. दोघांचेही हनुमान मंदिर उभारणीबाबत परस्परविरोधी दावे असल्याने वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाने केलेले समन्वयाचे प्रयत्न फोल ठरल्याने परिसराचे लक्ष लागून आहे.(Disagreement between 2 groups over land at Nagaon over construction of Hanuman temple )
उगाव येथील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार स्थानिक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुरु केला आहे. या मंदिराच्या उभारणीच्या जागेबाबत आक्षेप घेत ग्रामस्थ बाळासाहेब पानगव्हाणे यांनी प्रशासनाला निवेदन देऊन गट क्रमांक ३७५ मध्येच हनुमान मंदिर उभारणी करण्यात यावी, त्याची उभारणी गट क्रमांक ३७४ मध्ये अतिक्रमण करून करण्यात येऊ नये असे कळविले, मात्र मंदिराचे कामकाज सुरु झाल्याने त्यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरु केले आहे. (latest marathi news)
दुसरीकडे हनुमान मंदिराची सुरू असलेली उभारणी योग्य त्या जागेवरच आहे, त्यास कोणीही विरोध करू नये, प्रशासनाने त्याबाबत दखल घ्यावी व हनुमान मंदिराचे बांधकाम आहे त्या जागेवर सुरू ठेवावे या मागणीसाठी भगवान पानगव्हाणे यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरु केले आहे, त्यामुळे प्रशासनासमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. मंदिराचे कामकाज लोकवर्गणीतून होत आहे. उपोषणार्थींची वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडूनही त्याकडे बारकाईने लक्ष दिले गेले आहे, मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही.
''हनुमान मंदिराचे कामकाज हे पूर्वी मंदिर जिथे होते तेथेच लोकवर्गणीतून सुर आहे, त्यास कोणीही विरोध करून काम थांबवू नये.''- भगवान पानगव्हाणे, उगाव.
''हनुमान मंदिराचे कामकाज होण्यास आपला विरोध नाही, मात्र मंदिराचे कामकाज गट क्रमांक ३७५ मध्ये करण्यात यावे. ते गट क्रमांक ३७४ मध्ये अतिक्रमण करून होऊ नये हीच आमची भूमिका आहे.''- बाळासाहेब पानगव्हाणे, उगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.