Ganesha devotees enjoying Nutya esakal
नाशिक

Nashik Ganesh Visarjan Miravnuk: आदेश झुगारून विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट; शांतता समितीच्या सदस्यांकडूनच आदेश पायदळी

Ganesh Visarjan : पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजविण्यावर बंदी असताना, शांतता समिती सदस्यांकडूनच विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवत आणि शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजविण्यावर बंदी असताना, शांतता समिती सदस्यांकडूनच विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट केला. यासंदर्भात अद्याप पोलिसांची भूमिका संशयास्पद असली तरी पोलीसांनी ध्वनी क्षमतेच्या मर्यादेच्या नोंदी घेतलेल्या आहेत. मात्र, डीजे वाजविणार्या मंडळांना नेमका आशीर्वाद कोणाचा, अशी चर्चा जागरुक नाशिककरांमध्ये रंगली असून पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (Disobeying orders DJ noise in immersion procession in city )

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी राज्यातच नव्हे तर देशभरात आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शहर पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका घेत डीजे न वाजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचाही इशारा दिला होता. पोलिसांच्या या सूचनांना शांतता समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या गणेश मंडळांच्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी संमतीही दिली होती.

मात्र विसर्जन मिरवणुकीतील काही गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसविले तर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजविला. यावेळी पोलिसांकडून वारंवार डीजे न वाजविण्याच्या सूचना केल्या जात होत्या, परंतु मंडळ अन्‌ नाचण्यात बेधुंद झालेल्यांना या सूचनांचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

गुन्हे दाखल होणार का?

रवींद्र कुमार सिंगल हे पोलीस आयुक्त असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत दंडे हनुमान मित्र मंडळाने डीजे वाजविला होता. या प्रकरणी गजानन शेलार यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजला नाही. मात्र गेल्या मिरवणुकीत डीजे वाजविल्याप्रकरणी आठ मंडळांविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

पोलिसांकडून नोंद

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांसह ढोलताशांचा वापर करण्यात आला असला तरी काही गणेश मंडळांनी मात्र डीजेचा दणदणाट केला. पोलिसांनी यासंदर्भात स्वतंत्र पथक तयार करून या पथकाने ध्वनीमर्यादेच्या पातळीच्या नोंदी घेतलेल्या आहेत. या नोदींनुसार पोलिसांकडून कारवाई होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेषत: लेझर लाईट मात्र या मिरवणुकीत वापरण्यात आले नाही. गेल्या मिरवणुकीत त्याचा वापर झाल्याने काही भाविकांच्या डोळ्याला त्रास झाला होता.

''जुलूस आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरण्यास मनाई केली होती. जुलूसमध्ये एकही डीजे नव्हता परंतु गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर झाला आहे. त्यासंदर्भातील ध्वनीमर्यादेच्या नोंदी घेण्यात आल्या असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.''- किरणकुमार चव्हाण, उपायुक्त, परिमंडळ एक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT