Arun Dusing esakal
नाशिक

Nashik News : एकलहरे सरपंचांच्या विरोधातील विवादी अर्ज फेटाळला! शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एकलहरे (ता. नाशिक) येथे नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत अरुण परशुराम दुसिंग थेट सरपंचपदासाठी निवडून आल्यानंतर त्यांच्याविरोधात शंकर धनवटे यांनी दुसिंग यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार करत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यासाठी विवाद अर्ज दाखल केला होता. (disputed application against Eklahare Sarpanch was dismissed)

याबाबतचे कामकाज अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासमोर चालले. ग्रामसेवक व उपविभागीय अभियंता नाशिक उजवा तट कालवा यांनी दिलेल्या अहवालानुसार अरुण दुसिंग यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे किंवा अतिक्रमित मिळकतीचा उपभोग घेत असल्याचे सिद्ध न झाल्याने धनवटे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

एकलहरे ग्रामपंचायतीसाठी १८ नोव्हेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली, यामध्ये अरुण दुसिंग हे थेट सरपंचपदी निवडून आले होते. यानंतर अरुण दुसिंग व परशुराम शिवराम दुसिंग यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी एकलहरे येथील शंकर धनवटे यांनी नाशिक अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.

यानंतर महसूल प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित ग्रामसेवक व उपविभागीय अभियंता नाशिक उजवा तट कालवा यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, चौकशीअंती संबंधित यंत्रणेने सादर केलेल्या अहवालानुसार धनवटे यांनी उल्लेख केलेली नमुना नं. ८ च्या उताऱ्याप्रमाणे मालमत्ता क्र. १३५१ ही मिळकत पाटबंधारे खात्याच्या मालकीची दिसून येते. (latest marathi news)

तसेच सदर मिळकतीचे भोगवटदार म्हणून परशुराम दुसिंग यांचे नाव दाखल आहे. सदर मिळकत पडीक जागेचे क्षेत्र ४६४.६८ चौ. फूट इतके आहे. सदर मालमत्ता अरुण दुसिंग यांच्या नावाने दिसून येत नाही किंवा अरुण दुसिंग यांच्या नावावर असल्याबाबत ग्रामपंचायतीत कुठलेली रेकॉर्ड उपलब्ध नाही.

यामुळे अरुण दुसिंग यांनी ग्रामपंचायत एकलहरेच्या हद्दीत शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची कुठलीही नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला आढळून न आल्याचा अहवाल ग्रामसेवकांनी सादर केला आहे. तसेच अरुण दुसिंग यांचे व कुटुंबीयांचे आपसांत वाटपपत्र झाले असून, ते विभक्त राहात असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.

नाशिक उजवा तट कालवा उपविभागीय अभियंत्यांनी ४ ऑक्टोबर २०२३ च्या दाखल्याचे अवलोकन केले असता, मालमत्ता क्र. १३५१ वर अतिक्रमण झालेले नाही, असा दाखला दिला आहे. यामुळे अरुण दुसिंग यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत नाही.

या प्रकरणी उपलब्ध कागदपत्रे पुरावे व ग्रामसेवक, तसेच उजवा तट कालव्याचे उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या अहवालानुसार अरुण दुसिंग यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध न झाल्याने अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी शंकर धनवटे यांचा विवादी अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने मात्र दुसिंग यांना सरपंचपदावरून पायउतार करण्यासाठीची विरोधकांची खटपट निरर्थक ठरल्याचे बोलले जात आहे. ॲड. एस. डी. घोटेकर यांनी दुसिंग यांच्यातर्फे बाजू मांडली.

"लोकनियुक्त सरपंच दुसिंग यांनी कुठल्याही प्रकारे पाटबंधारे खात्याचे शासकीय मिळकतीवर अतिक्रमण केलेले नसताना केवळ राजकीय सूडापोटी सदर केस केली होती. मात्र सदर केसमध्ये आम्ही अतिक्रमण केले नसल्याचे भक्कम पुरावे सादर केले आणि अपर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार उपविभागीय अभियंता नाशिक उजवा तट कालवा यांचादेखील अहवाल मागविण्यात आला त्यातदेखील अतिक्रमण नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे गुणवत्तेवर निकाल होऊन धनवटे यांनी सरपंच यांना अपात्र करणेकामी केलेला खोटा अर्ज फेटाळण्यात आला." - ॲड. एस. डी. घोटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT