Dindori Lok Sabha Election esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Election : 2 मतदान केंद्रांचे अंतर सव्वादोनशे किलोमीटर; जळगाव आणि अहमदनगरच्या हद्दीपर्यंत विस्तार

Lok Sabha Election : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दोन टोकाच्या मतदान केंद्रांचे अंतर तब्बल सव्वादोनशे किलोमीटरइतके आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दोन टोकाच्या मतदान केंद्रांचे अंतर तब्बल सव्वादोनशे किलोमीटरइतके आहे. गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यापासून सुरु होणारा हा मतदारसंघ नांदगाव तालुक्यातील रोहिले या शेवटच्या गावापर्यंत पोहोचतो. (Dindori Lok Sabha Election)

तेव्हा छत्रपती संभाजी नगर, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या हद्दीला जाऊन मिळतो. एवढ्या मोठ्या मतदारसंघातील २० लाख ५३ हजार मतदारांपर्यंत पोहोचताना भल्याभल्या उमेदवारांना घाम फुटतो. दिंडोरी मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. येत्या २० तारखेला या मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्याचा विस्तार किती मोठा आहे, याचा विचार मतदारांनी कधी केलाय का?

सहा विधानसभा मतदारसंघ, नऊ तालुके, सात नगरपंचायती, तीन नगरपालिका आणि या व्यतिरिक्त ग्रामपंचायतींचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण १९२२ मतदान केंद्र आहेत. गुजरात हद्दीकडून विचार केला तर पहिले मतदान केंद्र हे सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा हे येते. काही लोक रघतविहिर हे देखील शेवटचे गाव सांगतात.

पण डांग जिल्ह्यापासून सुरुवात झाल्यानंतर कळवण, देवळा, चांदवड मार्गे नांदगावला पोहोचल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीपर्यंत सव्वादोनशे किलोमीटरचा पाच ते साडेपाच तासांचा सलग प्रवास होतो. येवला तालुक्याची हद्द ही अहमदनगरपर्यंत विस्तारली आहे. भौगोलिक विचार आपण केला तसाच नैसर्गिक विचार केला तर, सुरगाणा तालुक्यात सरासरी चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. (latest marathi news)

त्यामुळे आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळख असलेल्या सुरगाणा-कळवणकडे बघितले जाते. प्रत्यक्षात शेती पिकांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धरणेही असल्यामुळे या तालुक्यांत मुबलक पाणी आहे. या तुलनेत कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या नांदगाव व येवल्यात सरासरी ४०० मिलीमीटर इतका पाऊस पडतो.

दिवाळीचे फटाके वाजले की येथे टँकर सुरु होतात. कधी-कधी तर दिवाळीपूर्वीच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. नैसर्गिकदृष्ट्या भिन्न असलेल्या या दोन टोकांमध्ये मधल्या भागात संपन्नता दिसून येते. दिंडोरी, निफाड व चांडवड या तालुक्यांमध्ये द्राक्ष व कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. निर्यातीतून मिळणारा सर्वाधिक पैसा येथील शेतकऱ्यांना मिळतो.

त्यामुळे निर्यातीच्या धोरणावर येथील शेतकरी अवलंबून आहेत. प्रत्येक तालुक्यातील मतदारांचे प्रश्‍न भिन्न स्वरुपात असल्याचे दिसून येते. दरम्यान, विविधतेने नटलेल्या या मतदारसंघात मतदान घेण्याची तयारी केली आहे. ज्या ठिकाणी एसटी बस पोहोचणे शक्य नाही, अशा ठिकाणी चीप, टेम्पो पाठवून मतदान घेण्याची तयारी ठेवली आहे.

म्हणून उमेदवारांना वेळ कमी पडतो

प्रत्येक तालुक्यात एक - दोन दिवसांचा धावता दौरा केला तरी प्रचार फेरी पूर्ण व्हायला पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. त्यात प्रचार सभा, सामुदायिक सोहळे यांना वेळ दिल्याशिवाय लोक मतदान करणार नाहीत, याची जाणीव प्रत्येक उमेदवाराला असते. त्यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून उमेदवारी लवकर घोषित होण्याची मागणी इच्छुकांकडून होते. यंदा दिंडोरीत महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची वेळीच घोषणा झाल्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत आलेली दिसून येते.

मतदारसंघातील रंजक गोष्टी

नगरपंचायती : दिंडोरी, सुरगाणा, कळवण, निफाड, चांदवड, पेठ व देवळा

नगरपालिका : मनमाड, येवला, नांदगाव

तालुके : सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, देवळा, चांदवड, निफाड, नांदगाव व येवला.

मतदार : १८ लाख ५३ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT