नाशिक : श्री संत गाडगे महाराज जीवन गौरव आणि कर्मवीर निवृत्तीदादा बर्वे गोदागौरव पुरस्कार सोहळा सोमवारी होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक गणेश बर्वे यांनी दिली. श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे अनुयायी ज्येष्ठ समाजसेवक (कै.) निवृत्तीराव दादाजी बर्वे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री राजे छत्रपती सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे समाजसेवक (कै.) शंकरराव बर्वे सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतो.
राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण सोमवारी (ता. २२) कालिदास कला मंदिरात होणार आहे. विधान सभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानस्थानी असतील. पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री बबनराव घोलप, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार डॉ. सुधीर तांबे, महंत भक्तिचरणदास महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपसचिव सिध्देश शिंदे, शिवसेना नेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, करण गायकर उपस्थित राहणार आहेत. जीवनगौरव पुरस्कारार्थी नाशिक परीक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, महाराष्ट्र राज्य किमान वेतन महामंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचीक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका शिल्पा सरपोतदार, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आळंदीचे लोकगीतकर चंदन कांबळे, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा व सोपनदेव पाटील, गृहनिर्माणकर नरेश कारडा, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, म्हसोबा देवस्थानचे पोपटराव इंगळे, ज्येष्ठ नाट्य कलावंत वासुदेव दशपुत्रे, नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, इंडिया प्रेसचे कामगार नेते रामभाऊ जगताप, शैक्षणिक क्षेत्रातील महादेव घोडके, आदिवासी आश्रमशाळेचे भरत पटेल, चांदवडचे आशियाई नौकायान विजेता दत्तू भोकनळ यांचे प्रशिक्षक अशोक शेळके, अशोक सानप, चेतन पनेर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
विशेष पुरस्कार मार्तंड ढोलपथक, संकल्प हॉस्पिटल, दिलासा केअर सेंटर, मूकबधीर सेवाभावी संस्था, तानाजी बनकर सेवाभावी संस्था (पिंपळगाव बसवंत) यांना संस्था म्हणून तर कोरोना काळात विशेष कामगिरी केल्याबद्दल नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
गोदागौरव पुरस्कारार्थी सहकार क्षेत्र- जितेंद्र आहेर (देवळा), आदर्श युवा- नगरसेवक दीपक दातीर, स्वप्नील शेलार (त्र्यंबकेश्वर), नगरसेविका समिना मेनन, उद्योग क्षेत्र- उत्तम शिंदे (भगूर), आदित्य केळकर (दिंडोरी), शिवाजी जाधव (संगमनेर), आध्यात्मिक विद्वान- अरुण हेगडे (बेळगाव), पत्रकारिता- जहीर शेख, संतोष भोपी (वावी), शासकीय सेवा- ललित केदारे, राजू ढकोलिया, बापूसाहेब कारवाल, कामगार- हेमंत तेलंगी, सामाजिक क्षेत्र- मनोज जाधव, मिलिंद कोकणे (नामपूर), लालजी पाटील, सरला गाडे, शिवाजी देवरे, शिल्पा झारेकर, क्रीडा- यश पवार, सांस्कृतिक- चेतन राजापूरकर, दीपक दीक्षित, शैक्षणिक- संगीता सांगळे, माधुरी अमृतकर, संजय जोशी, संदीप टाले, प्रा. सोमनाथ विघे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. संतोष वाघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.