Distribution of more than 10 lakh saplings during Vanamahotsava esakal
नाशिक

Nashik News : वनमहोत्सवात 10 लाखाहून अधिक रोपांचे वाटप; हरित चळवळीसाठी ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ योजना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाने सुरू केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी आणि या प्रत्येकाचा सहभाग मिळावा या हेतूने वनविभाग आयोजित वन महोत्सव काळात ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहर व जिल्ह्यातून जवळपास दहा लाखाहून अधिक रोपांचे वाटप केले जाणार आहे. (Distribution of more than 10 lakh saplings during Vanamahotsava)

शासकीय व इतर काही संस्थांना मोफत, तर उर्वरित इच्छुकांना माफक दराने रोप उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरवर्षी वन विभागाचा वन महोत्सव १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात शहरीकरण व औद्योगीकरणामुळे वातावरणात बदल होऊन जागतिक तापमानात वाढ होत आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी, परिसराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर महोत्सव साजरा केला जातो. या कालावधीत शासकीय निमशासकीय, वनीकरणात काम करणाऱ्या संस्था तसेच शाळा, महाविद्यालयांना रोपे वाटप करून परिसराचे हरित अच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच महोत्सव कालावधीत शासकीय तसेच खासगी मालकीचे पडीक क्षेत्र, बांध, रेल्वे, कालवा, रस्ताच्या कडेला, गायरान क्षेत्र येथे वृक्ष लागवड व्हावी या उद्देशाने शेतकरी व वृक्षप्रेमींना माफक दरात पुरवठा करण्यात येणार आहे. (latest marathi news)

यांना होणार मोफत रोपवाटप

-ज्या शासकीय यंत्रणांना अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करावयाची आहे व जागा उपलब्ध आहे. मात्र त्यांच्याकडे निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद उपलब्ध नाही.

-वनीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी अशासकीय संस्था.

-ज्या शाळा महाविद्यालय व महाविद्यालय यांना संरक्षक भिंत आहे.

-पोलिस संरक्षण बल.

रोपांची वेळोवेळी माहिती देणे बंधनकारक

ज्या संस्थांनी रोपे स्वीकारली आहे. त्यांनी लागवड केलेल्या रोपांचे जिओ टॅगिंग करावे. पुढील तीन वर्षापर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी ऑक्टोबर व मे या कालावधीत घेऊन संबंधित यंत्रणेला त्याची नोंद व त्यांच्याकडे नोंद वहीत असली पाहिजे. तसेच अमृतवृक्ष वन विभागाने विकसित केलेल्या मोबाईल ॲपवर सर्व माहिती भरावी असे आवाहन केले आहे. तसेच मोफत पुरवठा केलेल्या रोपांची माहिती संबंधित शासकीय यंत्रणेवर सादर करणे ॲपवर बंधनकारक आहे.

"एकूण भूपृष्ठाच्या ३३ टक्के भाग हा वनक्षेत्र असला पाहिजे. सध्या तरी हे प्रमाण कमी आहे. या दृष्टीने वनविभागाच्या सामाजिक वनीकरणमार्फत वृक्ष लागवडीचे विविध प्रयत्न सुरू आहे. वनमहोत्सवांतर्गत किंवा नंतरही ज्या संस्थांना लागवडीसाठी रोपे हवे आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा." - गणेश रणदिवे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT