Nashik Mission Har Ghar Jal : तीव्र उन्हाळा जाणवू लागलेला असताना, पाणी टंचाईचे संकट अधिक गंभीर बनले आहे. या परिस्थितीत आदिवासी दुर्गम भागात महिलांना अनेक मैल डोक्यावर हंडा घेत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. महिलांच्या डोक्यावरील ओझे कमी करत उंडोहळ (ता. सुरगाणा) या पाड्यावर दोनशे रोलिंग ड्रमचे वाटप केले. ‘मिशन हर घर जल २०२४’ अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी दानशूर व्यक्ती व संस्थांचे आभार मानले. (Nashik Distribution of rolling drums to Undohal Mission Har Ghar Jal 2024)
उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. स्वयंशक्ती- स्त्री उद्यमी फाउंडेशन, रोटरी क्लब ॲाफ नाशिक नॉर्थ, इनरव्हील क्लब ॲाफ जेननेक्स्ट, नाशिक आणि ऋणमुक्त संस्था यांनी हा उपक्रम राबविला. आयोजक संस्थांनी रोलिंग ड्रमसाठी देणगीचे आवाहन केले होते. त्यास समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्राप्त देणग्यांतून पाड्यासाठी दोनशे रोलर ड्रम खरेदी केले. रविवारी (ता.१३) पाड्यावरील महिलांना ड्रमचे वाटप केले. स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक, उपाध्यक्षा स्वाती शाह, शीतल देसाई, शाल्मली शेट्टी, प्रकल्प समन्वयक स्वाती देवरे, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष प्रशांत सारडा, सचिव आशिष चांडक, खजिनदार राहुल जैन, प्रकल्प समन्वयक कपिल मोहता, इनर व्हील क्लब ऑफ जेननेक्टचे अध्यक्ष सरोज दशपुते, सचिव विद्या साखरे, प्रकल्प समन्वयक डॉ. मीनल पलोड, सविता बुलंगे, ऋणमुक्त संस्थेच्या अध्यक्षा रुपल गुजराथी आदी उपस्थित होते. (latest marathi news)
उपक्रमासाठी जल परिषदेचे देविदास कामडी व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सदस्य अगस्त्य मुनिम, तुषार माळोदे, इनरव्हील क्लब जेननेक्टचे संध्या साखरे, मोनल मोहता, सुरेखा महाले, रोटरी क्लब ऑफ ठाणेचे अध्यक्ष दीपक अगरवाल, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टारच्या अध्यक्षा उज्ज्वला अगरवाल, माजी अध्यक्षा मंजिरी देशपांडे आदींची उपस्थिती राहिली.
"समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांच्या मदतीने हे करु शकलो. यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील."- दीपाली चांडक, अध्यक्षा. स्वयंशक्ती.
"उंडोहळला राबविलेला उपक्रम सामाजिक जाणीवेतून पार पडला. महिलांना आधार दिल्याचे सर्वांना मनस्वी समाधान आहे."- प्रशांत सारडा, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ.
"भारासह तप्त उन्हात चालणे कठीण होते. विविध संस्था, दात्यांच्या योगदानातून महिलांच्या डोक्यावरील भार हलका झाला."- देविदास कामडी, जलपरिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.