candidates were allotted symbols. Mahant Siddheswarananda Maharaj and Shantigiri Maharaj who were present on this occasion esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : कुणाला फुगा, तर कोणाला मिळाली शिटी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप

Lok Sabha Constituency : चिन्हवाटपात कुणाला फुगा, तर कोणाला शिटी मिळाली. याशिवाय प्रेशर कुकर, टेबल, ट्रक, जहाज, ट्रे, तुतारी, सोफा अशी विविध चिन्हे उमेदवारांना बहाल करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी माघारीनंतर शिल्लक उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे चिन्ह निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. याव्यतिरिक्त अपक्ष व मान्यता नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह बहाल केले. (Distribution of symbols to independent candidates by election decision officer)

चिन्हवाटपात कुणाला फुगा, तर कोणाला शिटी मिळाली. याशिवाय प्रेशर कुकर, टेबल, ट्रक, जहाज, ट्रे, तुतारी, सोफा अशी विविध चिन्हे उमेदवारांना बहाल करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ६) दुपारी तीननंतर चिन्हवाटप झाले. नाशिकच्या उमेदवारांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी, तर दिंडोरीच्या उमेदवारांना अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी चिन्ह बहाल केले.

नाशिकमध्ये गॅस शेगडीसाठी तीन उमेदवारांचा अट्टहास होता. एकापेक्षा अधिक उमेदवारांनी मागणी केल्यामुळे त्यांची सोडत काढण्यात आली. यात वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना ‘लॉटरी’ लागली. तर शांतिगिरी महाराजांना बादली, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती यांना संगणक, जितेंद्र भाभेंना बॅट चिन्ह मिळाले. कांतिलाल जाधव यांना कोट, ‘आप’चे कैलास चव्हाण यांना किटली चिन्ह मिळाले.

नाशिकमधील उमेदवार व चिन्ह

हेमंत गोडसे (शिवसेना, धनुष्यबाण), राजाभाऊ वाजे (शिवसेना, उबाठा, मशाल), अरुण काळे (बसप, हत्ती), करण गायकर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), शांतिगिरी महाराज (बादली), स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती (संगणक), जितेंद्र भाभे (बॅट), चंद्रकांत ठाकूर (सीसीटीव्ही कॅमेरा), वामन सांगळे (धर्मराज्य पक्ष, टेबल). (Latest Marathi News)

आरिफ मन्सुरी (हिरा), दीपक गायकवाड (आगपेटी), अमोल कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पक्ष, प्रेशर कुकर), तिलोत्तमा जगताप (खाट), यशवंत पारधी (भारतीय अस्मिता पक्ष, ऑटो रिक्षा), भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पक्ष, फुगा), चंद्रकांत पुरकर (जहाज), गणेश बोरस्ते (गॅस शेगडी), सोपान सोमवंशी (शिवणयंत्र), सुषमा गोराणे (सोफा), कोळप्पा धोत्रे (ट्रक), सचिन दत्तात्रय देवरे (ट्रे).

जयश्री पाटील (सैनिक समाज पक्ष, द्राक्ष), देवीदास सरकटे (सफरचंद), कमलाकर गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकारी दल, हार्मोनियम), कैलास चव्हाण (किटली), कांतिलाल जाधव (आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया, कोट), दर्शना मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष, ऊस शेतकरी), झुंझार आव्हाड (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, शिटी), प्रकाश कनोजे (इस्त्री), धनाजी टोपले (रोडरोलर) सुधीर देशमुख (तुतारी).

दिंडोरीतील उमेदवार व त्यांचे चिन्ह

भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट), तुतारी वाजविणारा माणूस), डॉ. भारती पवार (भाजप, कमळ), तुळशीराम खोटरे (बहुजन समाज पक्ष, हत्ती), किशोर डगळे (आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया, कोट), गुलाब बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष, बॅट), मालती थविल (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), बाबू भगरे (तुतारी), अनिल बर्डे (रूम कुलर), दीपक जगताप (शिटी), भारत पवार (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, ऑटो रिक्षा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT