Nashik District Bank  esakal
नाशिक

Nashik District Bank : थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅंक पुन्हा सरसावली! जिल्ह्यात तालुकानिहाय बैठक घेत सुरू केली वसुली मोहीम

Nashik News : आर्थिक वर्षाअखेर काहीशी थंडावलेली कर्ज वसुली मोहीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुन्हा हाती घेतली आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका सुरू झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आर्थिक वर्षाअखेर काहीशी थंडावलेली कर्ज वसुली मोहीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पुन्हा हाती घेतली आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका सुरू झाल्या. बैठकांमध्ये थकबाकी वसुलीसाठी जप्ती आदेश, सहकार विभागाकडून वसुली दाखले प्राप्त करून त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.( District Bank start arrears recovery)

जिल्हा बॅंकेची तब्बल दोन हजार १०० कोटींची वसुली थकल्याने बॅंक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यातच मोठ्या थबाकीदारांकडून मदत मिळत नसल्याने बॅंकेचा एनपीए ७१.४५ टक्क्यांवर पोहोचला होता; तर बॅंकेचा तोटा हा ९०९ कोटींवर गेला. त्यामुळे ‘आरबीआय’कडून कधीही बॅंक परवाना रद्द करू शकते, अशी परिस्थिती आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी शासन व सहकार विभागाच्या आदेशाने बॅंकेने वसुलीचा अॅक्शन प्लॅन तयार केला. यात बॅंकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना आणली. नोव्हेंबर २०२३ पासून या योजनेची अंमलबजावणी बॅंकेने सुरू केली आहे. तसेच, बॅंक प्रशासनाने मालमत्तांचे लिलाव सुरू केले.

बॅंकेने आणलेली योजना अन वसुलीसाठी केलेले प्रयत्न यातून बॅंकेच्या ३१ मार्च २०२४ च्या ताळेबंदमधून बॅंकेला तब्बल ५९ कोटींचा नफा झाला असून, संचित तोटा कमी होऊन ८५० कोटींवर आला आहे. तसेच, ७७ कोटी एनपीए कर्जाची वसुली झाल्याने बॅंकेच्या ‘एनपीए’त दोन टक्क्यांनी घट झाली. असे असले, तरी बँक प्रशासनाने आता पुन्हा वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. १ नोव्हेंबर ते ३० जून या कालावधीत वसुली केली जाते. (latest marathi news)

त्यामुळे वसुलीसाठी आता हा अंतिम टप्पा आहे. त्यासाठी सल्लागार समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने वसुली मोहीम सुरू झाली. तालुकानिहाय बैठक घेतल्या जात आहेत. निफाड व येवला तालुक्यांची बैठक पार पडली असून, बागलाण आणि देवळा तालुका बैठक होणार आहे.

बैठकीत प्रामुख्याने बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२३-२४ अंतर्गत सुरू केलेली असून, त्यात तालुकावार सवलतीस पात्र असलेले सभासद संख्या व रक्कम तसेच ३० एप्रिल २०२४ अखेर सहभाग घेतलेल्या सभासदांचा कर्जवसुली आढावा.

केंद्र कार्यालयामार्फत दिलेले प्रत्येक तालुकावार तीन तिमाहीत ‘एनपीए’ वसुलीबाबत ३१ मार्च २०२४ अखेर दिलेल्या उद्दिष्टाची माहिती व साध्य केलेल्या ३० एप्रिल २०२४ अखेरच्या उद्दिष्टाची माहिती, जूनअखेर साध्य करावयाचे एकूण उद्दिष्ट २७१.०२ कोटी दिलेले असून, त्यापैकी माहे मे २०२४ अखेर ७० टक्के व माहे जून २०२४ अखेर ३० टक्के उद्दिष्ट पूर्ततेबाबतचा आढावा, ३० जून २०२३ अखेर थकीत तालुका टॉप १०० थकबाकीदार सभासदांकडील ३० एप्रिल २०२४ अखेर वसुली, ३० एप्रिल २०२४ अखेर थकीत थेट कर्ज थकबाकी वसुलीचा आढावा घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT