nashik district collector Jalaj Sharma statement Work as responsibility not challenge nashik news esakal
नाशिक

Nashik District Collector : आव्हान नव्हे, तर जबाबदारी म्हणून काम : जलाज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Collector : नाशिक राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. कार्यक्षेत्र, लोकसंख्या आणि महसुली अंगाने तो जबाबदारीचा जिल्हा आहे. त्यामुळे मी आव्हान म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून पाहतो.

त्यात शासनाच्या प्रशासनाकडून ज्या अपेक्षा आहे त्याला प्राधान्यच राहील, असे नवनियुक्त जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांनी सांगितले.

श्री. शर्मा यांनी शनिवारी (ता. २२) जिल्हाधिकारी पदाचा सायंकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. (nashik district collector Jalaj Sharma statement Work as responsibility not challenge nashik news )

अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदींसह विविध विभागाचे उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. श्री. शर्मा म्हणाले, की धुळ्यात मी जिल्हाधिकारीच होतो; परंतु नाशिक वेगळा जिल्हा आहे.

नाशिकचे राज्यातील स्थान महत्त्वाचे आहे. तसे लोकसंख्या आणि कार्यक्षेत्राच्या अंगाने तो मोठा जिल्हा आहे. विभागाचे महसुली मुख्यालय आहे. विविधेतसह विविध क्षेत्रात ठसा असलेल्या या जिल्ह्यात काम करताना वेगळा अनुभव असणार आहे. जिल्हाधिकारी हा प्रशासनाचा प्रतिनिधी असतो. शासनाच्या प्रशासनाकडून अपेक्षा असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रशासनाच्या प्रतिनिधी म्हणून शासनाच्या अपेक्षा पूर्ण करण्याला प्राधान्य राहील. त्यात शासनाचे उपक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न राहीन. इतर असा कुठला प्राधान्यक्रम म्हणून असणार नाही. जिल्ह्यातील पाणीटंचाई, भूमापन संदर्भातील तक्रारी यांसह विविध विषयांवर ते म्हणाले, की पाणीटंचाईचा आढावा घेतला जाईल.

धुळ्यात भूमापनविषयक तक्रारीची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. येथेही माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही होईल. पण आताच त्याविषयी भाष्य करणे योग्य होणार नाही. नाशिक महसुली विभागाचा जिल्हा असल्याने इतर जिल्ह्याचे या जिल्ह्याकडे पाहण्याची म्हणून एक भूमिका लक्ष असते. त्यामुळे विभागात चांगल्या कामाचा जिल्हा म्हणून काम करण्याचा प्रयत्न राहील, असेही स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : बंगाल, ओडीशाला चक्रीवादळाचा तडाखा

SCROLL FOR NEXT