Nashik District Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात शेतकरी संघटनांनी १३ महिन्यांपासून आंदोलन सुरूच ठेवले आहे. अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (ता. ६) या आंदोलकांशी चर्चा करीत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाला तत्काळ अहवाल पाठविण्याची ग्वाही दिली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या जिल्हा बँकेने कर्जदारांच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यास प्रारंभ केला आहे. (Collector will submit report of District Bank to Government )
त्याविरोधात शेतकरी संघटनांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर १३ महिन्यांपासून ठिय्या मांडला. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शर्मा यांनी नियोजन सभागृहात बँक, जिल्हा उपनिबंधक व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक दीपक पाटील, कर्जवसुली अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे व बँक कर्मचारी हिरे, शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे, प्रदेश काँग्रेसचे सदस्य दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, कांतिलाल भोये, मुरलीधर दळवी उपस्थित होते. (latest marathi news)
घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी
चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांनी बँकेने सक्तीची वसुली करू नये, अशी सूचना केली. याशिवाय ट्रॅक्टर विक्रीत घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. बँकेच्या चौकशीत गैरकारभार केलेल्या व्यक्तींकडून तत्काळ वसुली करण्याचे आवाहन या शेतकऱ्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.