leopard esakal
नाशिक

Nashik News : 9 वर्षांत 30 बिबट्यांचा मृत्यू; आजारपण, अपघातात सर्वाधिक गतप्राण

Nashik : राज्यात बिबट्याच्या वास्तव्यात नाशिक जिल्ह्याचा अग्रक्रम आहे. त्याच प्रमाणात त्यांचे मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

एस. डी. आहिरे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात बिबट्याच्या वास्तव्यात नाशिक जिल्ह्याचा अग्रक्रम आहे. त्याच प्रमाणात त्यांचे मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे. नाशिक जिल्ह्यात नऊ वर्षांत तब्बल ३० बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वन विभागाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणावरही नियंत्रण ठेवण्याठी वन विभागाला स्वंतत्रपणे नियोजन करावे लागेल. (Nashik district is leading in habitat of leopards in state and their death rate is highest marathi news)

मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगावजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. आजारपण व अपघातात बिबटे सर्वाधिक गतप्राण झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

अपघातात आठ बळी

नाशिक जिल्ह्यात बिबट्याची पैदास वाढत आहे. चिंचखेड (ता. दिंडोरी) येथे शेतात बिबट्याचे बछडे नुकतेच आढळले. नाशिक जिल्ह्यात तब्बल ३०० हून अधिक बिबट्याची नोंद वन विभागाकडे आहे. जिल्ह्यात बिबट्यांची पैदास वाढत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मृत्यूचा ही आलेख वाढत आहे. नऊ वर्षांत ३० बिबट्यांनी शेवटचा श्‍वास घेतल्याची नोंद वन विभागाकडे आहे. त्यात सर्वाधिक आठ बिबट्यांचा बळी हा अपघातात गेला. आजारपण, सर्पदंशाने आदी बरोबरच वृद्धापकाळाने ही मृत्यू ओढावले आहेत. (latest marathi news)

राज्यात नाशिक अव्वल

राज्यात नाशिक जिल्ह्यात बिबट्याची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ सातारा, नगर जिल्ह्यात बिबट्याचा अधिवास आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबककेश्‍वर, दिंडोरी हे तालुके बिबट्याचे हॉटस्पाॅट आहेत. गोदावरी, दारणा, कादवा या नद्या प्रावहित होत असून लगत ऊसाचे मोठे क्षेत्र आहे.

अशात बिबट्यांना लपण्यासाठी प्रजननासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. नदीमुळे पिण्याच्या पाण्याची सोय, शिवाय ऊसाच्या शेतीत बिबट्याला सुरक्षित वाटते. ऊसाबाहेर पडताच भक्ष्य म्हणून कुत्रे, मांजरी, वासरू सहज उपलब्ध होते. त्यामुळे उसाच्या पट्टयात बिबट्याचा वावर अधिक आढळतो. उसाचे क्षेत्र बिबट्यांना सर्वच दृष्टीने पुरक असल्याने बिबट्याची संख्या वाढत आहे.

मानव, श्‍वापदांचा लढा वाढला

उसाच्या क्षेत्रात बिबट्याचा वास्तव्याबरोबरच मानवी वस्तीभोवती श्‍वापदांची रेलचेल वाढली आहे. त्यात सर्वाधिक जास्त बिबट्याचा समावेश आहे. त्यामुळे बिबटे व मानव यांचा लढा तीव्र झाल्याचे नाशिक शहरात नागरी वस्ती, हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याची घुसखोरीवरून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT