मालेगाव (नाशिक) : राज्यातील साखर उद्योगाला सरता हंगाम लाभदायी ठरला. हंगामात १०१ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण २०० साखर कारखान्यांमधून गळीत हंगाम घेण्यात आला. एक हजार ३२० लाख मेट्रीक टन ऊस गाळप करण्यात आला. यातून एक हजार ३७२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखर उतारा १०.४० एवढा राहिला. दहा वर्षातील सरासरी गाळप हंगाम १७३ दिवसाचा राहिला. गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी ऊस गाळप व उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर या आठही विभागातून हंगाम घेण्यात आला. साखरेचे सर्वाधिक ३००.४१ लाख टन उत्पादन कोल्हापूर विभागातून घेण्यात आले. या पाठोपाठ पुणे २९१.२९, सोलापूर २८४.३६ व अहमदनगर २००.७२ लाख टन उत्पादन झाले. औरंगाबाद विभागातून १२९.२७ तर नांदेडमधून १५३.२६ लाख टन उत्पादन झाले. अमरावती ९.६७ व नागपूर ३.८२ लाख टन साखर निर्मिती झाली. शिल्लक उसामुळे अहमदनगर विभागात सरासरी १८१, औरंगाबाद १८८ तर नांदेड विभागात १९१ दिवस हंगाम सुरु होता.
गेल्या हंगामात ९४ सहकारी व ९६ खासगी अशा एकूण १९० कारखान्यातून साखर उत्पादन घेण्यात आले. गेल्या वर्षी एक हजार १३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन एक हजार ६४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखर उतारा १०.५० तर सरासरी गाळप दिवस १४० होते. राज्यातील जास्त उसामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरु होता. दहा वर्षात प्रथमच एवढे दिवस गळीत हंगाम सुरु राहिल्याने साखर उद्योगाशी निगडित विविध घटकांना दिलासा मिळाला. पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने सर्वाधिक २४ लाख ७८ हजार ९२२ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. कारखान्यांना सर्वाधिक २३ लाख ४५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. ब्रिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १२.९९ राहिला.
नाशिक जिल्हा सोळाव्या क्रमांकावर
गळीत हंगामात ऊस गाळप व साखर उत्पादनात नाशिक जिल्हा सोळाव्या क्रमांकावर आहे. राज्यातील २२ जिल्ह्यातून साखर उत्पादन घेण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २२९ लाख मेट्रीक टन उसाची गाळप होऊन २१६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. नाशिक जिल्ह्यात पाच कारखान्यांमधून १५.२५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन १५.४९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्याचा साखर उतारा ९.९३ तर सरासरी गाळप दिवस १४० राहिले आहे.
"वैद्यनाथ, बीड अंबाजोगाई, सहकार शिरोमणी पंढरपूर सारख्या सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या साखर कारखान्यांनी १६-१७ महिने हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला ऊस घेतला. या तीनही कारखान्यांसह अनेक कारखान्यांनी अद्यापही ऊस उत्पादकांना ठरलेली एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. ऊस उत्पादकांचे शेकडो कोटी रुपये थकीत आहेत. या प्रकरणाची साखर आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. औरंगाबादसह इतर विभागातील शिल्लक उसासाठी जाहीर केलेली आर्थिक मदत तत्काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी."
- कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक
* एकूण ऊस गाळप - १३२०.३१ लाख टन
* एकूण साखर उत्पादन- १३७.२८ लाख टन
* सरासरी साखर उतारा - १०.४०
* सरासरी गाळप दिवस - १७३
* जास्तीत जास्त गाळप दिवस - २४०
* कमीत कमी गाळप दिवस - ३६
मागील दहा वर्षांचे ऊस क्षेत्र, गाळप क्षमता, हंगाम घेतलेले कारखाना संख्या व हंगामाचे दिवस
हंगाम - उसाखालील क्षेत्र (लाख हेक्टर)- स्थापित गाळप क्षमता (लाख टन प्रतिदिन) - कार्यरत गाळप क्षमता (लाख टन प्रतिदिन) - हंगाम घेतलेले कारखाने संख्या- हंगामाचे दिवस
२०२१-२२ - १३.६७ - ९.०५- ८.०१ - २०० - १७३
२०२०-२१ - ११.४२ - ८.६० - ७.२८- १९० - १४०
२०१९-२० - ८.२२-८.३९- ५.६५- १४७ - १२७
२०१८-१९ - ११.६२ - ८.३९ - ७.३७ - १९५ - १४२
२०१७-१८- ९.०२-७.९८- ६.६८-१८८-७२
२०१६-१७ - ६.३३- ७.१९ - ५.०७- १५० - १२६
२०१५-१६ - ९.८७- ७.०७ - ५.९ - १७७ - १५०
२०१४-१५- १०.५४ - ६.६३ - ५.५६ - १७८ - १३२
२०१३-१४ - ९.३७ - ६.०९ - ४.६३ - १५७ - १२८
२०१२-१३ - ९.६४ - ५.९९ - ४.८९ - १७० - १४५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.