A diving pool that has been closed for four years. esakal
नाशिक

Nashik News : जलतरण खेळाडू सरावापासून वंचित; राजमाता जिजाऊ तरण तलावांमधील डायव्हिंग पूल बंदच!

Nashik : नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलावांमधील डायव्हिंग पूल २०२० पासून बंद आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलावांमधील डायव्हिंग पूल २०२० पासून बंद आहे. कोरोना कालावधी व पाणीटंचाईमुळे सदर पूल बंद करण्यात आला होता. तो अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू सरावापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या चार वर्षापासून या डायव्हिंग पुलाला पाण्याची प्रतीक्षा आहे. २०१९ अखेरीस कोरोना या महामारीचे संकट ओढवले. (Diving pools in Rajmata Jijau swimming pools remain closed)

त्याचदरम्यान गर्दीच्या नियमांची २०२० पासून निर्बंधे आली. त्याचाच एक भाग म्हणून तरण तलाव बंद करण्यात आला. कोरोना लाट ओसरल्यानंतर तरण तलाव पुन्हा सुरू झाला. मात्र १६ फूट खोल असलेला ड्रायव्हिंग पूल हा मात्र अद्याप सुरू झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी हा एकमेव तरण तलाव आहे. जलतरणमधील बाकी खेळ प्रकारातील स्पर्धा सध्या येथे होऊ शकतात. मात्र डायव्हिंग पूल उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंची अडचण होत आहे.

दरम्यानच्या काळात मनपा प्रशासनाकडून पाणीटंचाईचे कारण देत डायव्हिंग पूल बंदच ठेवण्यात आला आहे. यास चार वर्षे उलटूनही अजूनही सुरू झालेला नाही. जलतरण स्पर्धेमध्ये डायव्हिंग हा स्वतंत्र खेळ प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय अथवा देशपातळीवर नाशिकच्या खेळाडूंना प्रॅक्टिससाठी डायव्हिंग पूल बंद असल्यामुळे जलतरणपटूंनी प्रॅक्टिस कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी मनपा प्रशासनाने लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून डायव्हिंग पूल सुरू करावा अशी मागणी क्रीडा प्रेमी करत आहे. डायव्हिंग हा एक स्वतंत्र खेळ प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला राजमाता जिजाऊ तरण तलाव हा २००१ ला सुरू झाला. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक होता. आंतरराष्ट्रीय दर्जाचा त्या वेळी भारतातील हा एकमेव तरण तलाव होय. सध्या दिल्ली येथील तालकोतरानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजनाच्या सुविधा असलेला हा एकमेव तरण तलाव होय. (latest marathi news)

तसेच आशिया खंडातीलही काही महत्त्वाच्या तरण तलावांपैकी हा एक आहे. या तरणतलावामध्ये एकूण पाच पूल आहे. नवशिक्यांना शिकवण्यासाठी, प्रोफेशनल खेळाडूंसाठी सात फूट खोल, बेबी पूल, महिलांसाठी इनडोअर व सध्या बंद असलेला डायव्हिंग पूल दोन हजाराहून अधिक वार्षिक व कायमस्वरूपीचे सभासद तरणतलावाचे आहे. उन्हाळ्यामध्ये तर एका बॅचमध्ये साधारण २०० ते २५० नागरिक स्वीमिंग करण्यासाठी येतात.

३५ लाख लिटर पाणी आवश्यक

पाणीटंचाई निर्माण झाल्यास तरण तलाव बंद करण्यात येतो. जो सद्यःस्थितीत बंद आहे, त्या डायव्हिंग पुलाला अंदाजे जवळपास ३५ लाख लिटर पाणी आवश्यक आहे. सर्व पाचही पूल मिळून ७० लाखाहून पाणी उपलब्ध असावे लागते. तीन ते चार लाख लिटर त पाणी हे वॉटर सर्क्युलेशनसाठी आवश्यक आहे.

''राजमाता जिजाऊ तरण तलावातील डायव्हिंग पूल पाणीटंचाईमुळे बंद करण्यात आला होता. सदर पूल पुन्हा सुरू करण्यासाठी मनपा पाठपुरावा केलेला आहे. यासंदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. त्या दृष्टीने सुरवात झालेली आहे. लवकरच खेळाडूंसाठी डायव्हिंग पुलामध्ये पाणी उपलब्ध होईल.''- माया जगताप, व्यवस्थापक, राजमाता जिजाऊ तरण तलाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT