Kishor Darade
Kishor Darade esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency Result : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत किशोर दराडे दुसऱ्यांदा उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल २४ तास चाललेली मतमोजणी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास संपली. बहुचर्चेत आणि लक्षवेधी असलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बाजी मारली आहे. कुस्तीच्या आखाड्यातले पहीलवान म्हणून ओळख असलेले श्री. दराडे शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचले आहे. (Nashik Teacher Constituency)

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत नाशिक विभागातून या निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत रंगली.

किशोर दराडे (शिवसेना) यांना तपशीलवार मतमोजणीअंती पहिल्या पसंतीची 26 हजार 476 मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19 व्या वगळणी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32 हजार 309 मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी सात वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती. सायंकाळी ९ वाजेपर्यंत पहिल्या पसंतीची मोजणी पूर्ण झाली मात्र दुसऱ्या पसंतीचे साडेपाच हजार मते मोजण्यासाठी दहा ते बारा तासाचा अवधी गेल्याने मत मोजणी प्रक्रिया लांबली होती. (latest marathi news)

अखेर आज मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निकालाचे चित्र स्पष्ट झाले. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी  31 हजार 576  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली.

यामध्ये 19 व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी 31 हजार 576  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. 19 व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली.

श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 5 हजार 60 मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे याना तिसऱ्या फेरी अखेर 17 हजार 393 मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची 6 हजार 72 मते पडली.मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

गेले सहा वर्षे शिक्षकांसाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती मला शिक्षकांनी दिल्याचे प्रतिक्रिया आमदार दराडे यांनी विजयानंतर व्यक्त केली. कोल्हापूरच्या तालमीत कुस्ती खेळणारा पहिलवान,छोटा व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक ते शिक्षक आमदार असा त्यांचा प्रवास नक्कीच हेवा वाटावा असाच आहे.

विशेष म्हणजे स्वत: राजकारणात नसतांना यापूर्वी गेले 25 वर्ष राजकारणातील मास्टरमाइंड म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या किशोरभाऊंनी घरात अनेक पदे आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. आता त्यांच्या विजयात बंधू रामदास दराडे,लक्ष्मण दराडे, पुतण्या देविदास,गोकुळ,रुपेश व मुले शुभम व सिद्धात,पत्नी मीना यांच्यासह कुटुंबीयांचा, आप्तस्वकीयांचा आणि हजारवर शिक्षकांचा देखील सिंहाचा वाटा राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT