Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Fraud : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष; सायबर भामट्याकडून डॉक्टरला दीड कोटीचा गंडा

Cyber Fraud : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघडकीस आलेले असतानाही, शहरातील एका डॉक्टरला सायबर भामट्याने तब्बल दीड कोटींना गंडा घातला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cyber Fraud : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघडकीस आलेले असतानाही, शहरातील एका डॉक्टरला सायबर भामट्याने तब्बल दीड कोटींना गंडा घातला. एका शेअरवर बोनस, आणि कंपनीचे स्टॉक आयपीओवर निव्वळ नफा देण्याचे आमिष सायबर भामट्यांनी दाखविले होते. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ( doctor lost one crore by showing lure of high returns in stock market )

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉक्टरसह दोघांना सायबर भामट्यांनी २८ मार्च ते २० मे दरम्यान वेगवेगळ्या व्हाटस्अॅप आणि इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन संपर्क साधला होता. त्यावेळी भामट्यांनी आम्ही शेअर मार्केटमधील अधिकृत कंपनीचे ब्रोकर असून, गुंतवणूक करायचीच आहे आणि आर्थिक फायदाच हवा असेल तर आमच्याकडे ट्रेडिंग, स्टॉक टू आयपीओ घेण्याचे व त्यातून जादा परताव्याचे आमिष दाखविले.

तसेच, शेअर मार्केटमधील स्टॉक आणि आयपीओ स्वतंत्ररीत्या घेतल्यास आर्थिक फायद्याचे असल्याचे सांगत, कंपनीचे ट्रेड, स्टॉक आम्हीच विकू शकतो, त्यामुळे गुंतवणूकदारास कुठलेही आर्थिक नुकसान होत नाही असेही पटवून सांगितले होते. सायबर भामट्यांनी विश्वास संपादन केल्याने डॉक्टरसह दोघांनी आर्थिक गुंतवणूक करण्यास समर्थता दर्शविली. यानंतर संशयित सायबर भामट्यांनी संबंधित मोबाईल अॅपवरुन इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेडींग व आयपीओ कन्फर्म अलॉटमेंट दिसतील असे भासविण्याचा बहाणा करून जास्त नफा मिळेल, असे दाखविले.

संशयितांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरने तब्बल १ कोटी ४३ लाख रुपये गुंतविले, तसेच इतर दोघांनीही एकूण १३ लाख रुपये गुंतविले. संशयितांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर पैसे भरले असता संशयितांनी काही प्रमाणात नफा बँक खात्यात क्रेडिट झाल्याचे भासविले. प्रत्यक्षात हे पैसे डॉक्टरसह इतरांच्या बँक खात्यात आलेच नाही. यात फसवणूक झाल्याचे उघड होताच, त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: एसटीचे स्टेरिंग निवडणूक आयोगाच्या हाती; कोकणातील मतदारांची आपल्या गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड सुरू

Baramati Assembly Election : बारामतीकर साहेबांना साथ देतील; युगेंद्र पवार यांचा विश्वास

EVM Issues In Pune: "आम्ही चुकलो तर कारवाई, मग तुमचं काय?"; पुण्यात EVM मशीनमध्ये बिघाड, कोथरुडमधील युवतीचा आक्रमक सवाल

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

SCROLL FOR NEXT