Organ Donation  esakal
नाशिक

Organ Donation : ब्रेनडेड डॉक्टरची मृत्यूनंतरही रुग्णसेवा; भाऊ, पत्नीच्या संकल्पाने समाजापुढे अवयवदानाचा आदर्श

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देऊन अनेक रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टरच अपघातामुळे ब्रेनडेड (मेंदूमृत) झाले. परंतु यानंतरही त्यांच्या अवयवांनी पाच जणांना जीवनदान दिले आहे. शहरातील सह्याद्री रुग्णालयात अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. यासाठी मयत डॉक्टर यांच्या पत्नी व भावाने अशा नाजूक स्थितीतही अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. (Nashik News)

सह्याद्री सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला यांच्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील दात्याने येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ४६ वर्षीय डॉ. नितीन मोगल यांना अपघातामुळे मेंदूला गंभीर इजा झाली. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देताना नेहमीच सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या डॉ. नितीन मोगल यांच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

परंतु पत्नी रेखा व बंधू रमेश यांनी अशा भावनिक प्रसंगातही सामाजिक भान राखत डॉ. मोगल यांनी घालून दिलेल्या समाजसेवेच्या आदर्शामुळे त्याच्या मृत्यूपश्चात त्यांचे अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार करण्यात आली.

पाच रुग्णांना जीवनदान

सह्याद्री सुपर स्पेशालिटीतील पथकाने झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीबरोबर (झेडटीसीसी) संपर्क साधत डॉ. नितीन मोगल यांचे यकृत, किडनी, फुफ्फुस हे अवयवदान करता येत असल्याने त्याकरिता प्रक्रिया सुरू केली. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच प्रतीक्षा यादीतील एका महिला रुग्णावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. पुणे येथे क्रिटिकल पेशंटला यकृत हे पुणे येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. (Latest Marathi News)

"डॉ. नितीन यांनी अविरत रुग्णसेवा केली. परंतु दुर्दैवाने ते आमच्यातून निघून गेले. अवयवदान या संकल्पनेतून त्यांची अपूर्ण राहिलेली रुग्णसेवा पूर्ण व्हावी या हेतूने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला." - रेखा मोगल, पत्नी

"डॉ. नितीन मोगल यांनी गेली २५ वर्षे दात्याने येथे रुग्णसेवा केली. कोरोना काळात न कंटाळता पूर्ण वेळ रुग्णसेवा केली. त्यांची अपूर्ण राहिलेली रुग्णसेवा या अवयवदानाने पूर्ण होईल, तसेच इतरांना जीवदान मिळेल."- रमेश मोगल, डॉ. मोगल यांचे भाऊ.

यशस्वी ग्रीनकॉरिडोअर

पुणे येथे अवयवदान मोहिमेसाठी सहायक पोलिस निरीक्षक यतीन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश खैरनार, अंमलदार श्री. निकम, श्री. गोसावी, श्री. काकड, श्री. निंबेकर यांनी ग्रीन कॉरिडॉरसाठी अथक परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT