flyover ( file Photo ) esakal
नाशिक

Nashik News : डबलडेकर पुलाचा रॅम्प सारडा सर्कलपर्यंत; 500 मीटरच्या वाहतुकीचा प्रश्न निघणार निकाली

Nashik : वाढत्या शहरांमध्ये वाहतुकीचे प्रश्न जटिल होत असताना उड्डाणपूल हा त्यावर सध्या तरी प्रभावी उपाय ठरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाढत्या शहरांमध्ये वाहतुकीचे प्रश्न जटिल होत असताना उड्डाणपूल हा त्यावर सध्या तरी प्रभावी उपाय ठरत आहे. त्या उपरही एकाच रस्त्यावर हलकी, अवजड व रेल्वे धावणार असेल तर डबलडेकर पूल हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. नाशिक रोडच्या दत्तमंदिर चौक ते द्वारका या दरम्यान वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन डबलडेकर पूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (nashik double decker bridge between Datta Mandir Chowk and Dwarka marathi news)

आता नवीन संरचनेनुसार डबलडेकर पुलाचा रॅम्प सारडा सर्कलपर्यंत उतरणार आहे. त्यामुळे जवळपास ४०० ते ५०० मीटरच्या वाहतुकीचा प्रश्नदेखील निकाली निघणार आहे. नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. उपनगरेदेखील आता मुख्य शहराला येऊन मिळत आहे. उपनगरांमध्येही उपनगरे मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याने या सर्वांचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

शहरांमध्ये सद्यःस्थितीत दिवसभरात अडीच ते पावणेतीन लाख वाहने रस्त्यांवर धावतात. त्यात नाशिक शहरातून मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे हे दोन मोठे मार्ग गेले आहेत. त्यामुळे अवजड वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात होते. गरवारे पॉइंटपासून ते आडगावपर्यंत उड्डाणपूल तयार झाल्याने काही प्रमाणात वाहतुकीवरचा ताण कमी झाला. मात्र नाशिकहून पुण्याकडे जाताना नाशिक रोडपर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. (latest marathi news)

द्वारका, काठे गल्ली, फेम सिनेमा, डॉ. आंबेडकरनगर, उपनगर, नेहरूनगर, अंधशाळा, दत्तमंदिरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते. वाढत्या वाहतुकीमुळे सागरमाला प्रकल्पाअंतर्गत उड्डाणपूल टाकण्याचे निश्चित झाले. मात्र याच भागातून नव्याने टायर बेस्ट मेट्रो प्रकल्प होणार असल्याने त्याचादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक नेत्यांच्या मागणीवरून दत्तमंदिर ते द्वारका असा डबलडेकर उड्डाणपूल मंजूर केला.

वडाळा नाका भागातील वाहतुकीवर उपाय

द्वारका ते नाशिक रोड हा भाग भारत सरकारच्या सागरमाला योजनेत समाविष्ट आहे. सागरमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक व्यूहात्मक व ग्राहकाभिमुख प्रकल्प आहे, यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. डबलडेकर उड्डाणपुलाचा रॅम्प राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलावरून येणार आहे. त्यामुळे डबलडेकर फुलाचा रॅम थेट सारडा सर्कलपर्यंत येणार आहे. त्यामुळे द्वारकासह वडाळा नाका व सारडा सर्कल भागातील वाहतुकीचा प्रश्नदेखील मिटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT