DPN- PHN CET Exam : शुश्रूषा संवर्गाशी संबंधित मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी २०२४ या परीक्षेतून प्रवेश दिला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी होत असलेल्या या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला सुरवात झालेली असून, ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. (nashik DPN and PHN CET registration deadline till 30 April )
मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. सीईटी सेलच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी व ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. तसेच परीक्षेसाठी आवश्यक असलेले शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे. (latest marathi news)
राज्यात चार जिल्ह्यातच परीक्षा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा चार जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. संगणकावर आधारित ऑनलाइन (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) पद्धतीने एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
नर्सिंग सीईटीसाठी २५ पर्यंत मुदतवाढ
बी.एस्सी नर्सिंग, सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) व सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण (जीएनएम) या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांसाठी एमएच-नर्सिंग सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत ३१ मार्चपर्यंत दिलेली होती. मात्र उमेदवार व पालकांकडून अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची विनंती सीईटी सेलला प्राप्त होत होत्या. त्यानुसार या सीईटी परीक्षेच्या नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. पात्रताधारक विद्यार्थी २५ एप्रिलपर्यंत सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.