Dr. Dignitaries including Minister Chhagan Bhujbal, Guardian Minister Dada Bhuse, MLA Devyani Farande and others while saluting Babasaheb Ambedkar at midnight on Saturday. esakal
नाशिक

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: आसमंतात घुमला ‘जयभीम’ नारा; शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात

Ambedkar Jayanti : जयभीम घोषणा व ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत निघालेल्या मिरवणुकीने भीमसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला होता.

सकाळ वृत्तसेवा

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : आकर्षक विद्युत रोषणाईने सजविलेले चित्ररथ, आबालवृद्धांनी संपूर्ण मार्गावर केलेली गर्दी, जयभीम घोषणा व ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करत निघालेल्या मिरवणुकीने भीमसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला होता. शहरातील मुख्य मिरवणुकीत विविध सतरा मंडळांच्या चित्ररथांनी सहभाग नोंदविला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यावर सायंकाळी सहाला मिरवणुकीस प्रारंभ झाला. (nashik Dr Babasaheb Ambedkar Jayanti celebration in city )

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी पारंपारिक वाद्याच्या तालावर काढलेल्या मिरवणुककीत सहभागी समाजबांधव.

ढोल ताशे, डीजेच्या आवाजात व भीमगीतांच्या तालावर ठेका धरलेल्या तरुणाईने मिरवणुकीस शोभा वाढविली. मिरवणुकीत भीमशक्ती मित्रमंडळ, राहुल मित्रमंडळ, सम्राट मित्रमंडळ, धम्म जागृती सांस्कृतिक युवा मंच, बुद्ध संदेश मित्रमंडळ आदी मंडळाच्या १७ चित्ररथांनी सहभाग नोंदविला.

या वेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अध्यक्ष अक्षय साळवे, आयोजन समितीचे माजी नगरसेवक संजय साबळे, दिलीप साळवे, रोहन दाणी, दीपक डोके, अविनाश शिंदे, योगेश तेजाळे, विशाल जाधव सहभागी झाले होते. मिरवणुकीत सहभागी गौतम बुद्धांचा जिवंत देखावा लक्षवेधी ठरला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. (latest marathi news)

नाशिक रोड भागात अभूतपूर्व उत्साह

नाशिक रोड, उपनगर, जेलरोड, देवळालीगाव, विहीतगाव, चेहेडी, सिन्नर फाटा, शिंदे, पळसे, एकलहरे, सामनगाव परिसरातून पंचवीसच्या वर चित्ररथ निघालेले होते. मिरवणुक मार्गावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काही मंडळांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केली होती.

एकनिष्ठ फ्रेंड सर्कल, जेल रोड युवा सोशल फाउंडेशन, साहेब युवा सोशल फाउंडेशन, अश्विनी कॉलनी मिलन, एकलहरे सार्वजनिक भीमोत्सव समिती, वाय. पी. फ्रेंड सर्कल, सम्राट, शिवरत्न, सार्वजनिक सांस्कृतिक कला व क्रिडा, मिलन, सामनगाव राजवाडा, त्रिशरण, शिखरेवाडी, पंचशील तरुण, पंचशील कॉलनी, आतषबाजी, आम्रपाली अचानक, प्रबुद्ध, संविधान फाउंडेशन, सिध्दार्थ सम्राट त्यागमाता रमाई महिला व गौतमनगर फ्रेंड सर्कल, निर्मिक सोशल फाउंडेशन, उपनगर फ्रेंड सर्कल या मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT