नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी (ता. १४) शहरभर उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातील मुख्य मिरवणुकीसह नाशिकरोड येथे मिरवणूक तर, पाथर्डी फाटा येथे कार्यक्रमाचे नियोजन आहे. या जयंती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार वा गालबोट लागू नये, यासाठी शहर पोलिस अलर्टमोडवर आहेत. खबरदारी म्हणून जयंती मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. (nashik Dr Babasaheb Ambedkar Jayanti police tight security)
तसेच, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलीसांची नजर असणार आहे. या पाश्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, ठिकठिकाणी विविध मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. जुने नाशिकमधील राजवाडा येथून मुख्य मिरवणूक दरवर्षी निघत असते.
यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच, मिरवणुकीवर यंदा ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
आयुक्तालय हददीतील जुने नाशिक, नाशिकरोड व पाथर्डी येथे साजरी होणाऱ्या जयंतीसाठी तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासह स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष गोपनीय शाखेसह राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), क्यूआरटी असे सर्व पथके तैनात राहणार आहेत. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत यांनी बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. (latest marathi news)
एक मंडळ - एक अधिकारी
जुन्या नाशिकमधून निघणार्या मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार्या प्रत्येक मंडळासमवेत एक पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्तीचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता नियुक्त केलेले पथक घेईल. तसेच करडी नजर राहणार आहे. याशिवाय साध्या वेशातील पोलीसही मिरवणुकीत सहभागी असणार आहेत.
असे असेल बंदोबस्त
पोलिस आयुक्त : १
उपायुक्त : ४
सहायक आयुक्त : ६
पोलिस निरीक्षक : ३९
सहायक/उपनिरीक्षक : १२७
अंमलदार : ११७६
महिला पोलिस : ३००
होमगार्ड : ३००
राखीव पोलिस तुकडी : ४
शीघ्रकृती दल : २
दंगल नियंत्रण पथक : १
''डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असेल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सीसीटीव्हीद्वारे नजर असेल. जादा कुमकही सज्ज आहे.''- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.