Dr. Bharti Pawar esakal
नाशिक

Dr. Bharti Pawar : विरोधकांकडून कांदाप्रश्‍नावर राजकारण : डॉ. भारती पवार

Dr. Bharti Pawar : नाफेडकडून कांद्याची नियमित तपासणी सुरू असते. माझ्याही कारकीर्दीत केंद्र सरकारमार्फत कांदाप्रश्‍नावर नेहमी तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dr. Bharti Pawar : नाफेडकडून कांद्याची नियमित तपासणी सुरू असते. माझ्याही कारकीर्दीत केंद्र सरकारमार्फत कांदाप्रश्‍नावर नेहमी तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु विरोधकांनी कांदाप्रश्‍नावर राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करताना दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे लोकसभेत चुकीच्या लोकांसोबत बसले असून, ते षडयंत्रात अडकलेले खासदार असल्याची टीका माजी मंत्री डॉ. भारती पवार यांनी केला. ( Dr Bharti Pawar statement of Politics on onion issue by opposition )

देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला २५ जूनला ४९ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या घटनेचा भाजपकडून देशभर निषेध केला जात असल्यानिमित्ताने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. डॉ. पवार म्हणाल्या, की १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या करणारे आज भारतीय घटनेची प्रत घेऊन राजरोसपणे फिरत आहेत.

लोकशाहीची हत्या करणारे घटनेची प्रत घेऊन लोकसभेत बसले आहेत. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवरही काँग्रेसने बोलावे, असे आवाहन केले. ग्रेसच्या सत्ताकाळात ७५ वेळा घटनेत बदल करण्यात आले. ९० वेळा देशातील वेगवेगळी राज्यसरकारे बरखास्त करून घटनेची हत्या केली. भाजप सत्तेत आल्यास घटनेत बदल करेल, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला. (latest marathi news)

खोट्या प्रचारातून दलित, आदिवासींची फसवणूक केली. काँग्रेसने अनेकदा घटनेची पायमल्ली केली. काँग्रेसच्या काळातील काळा दिवस आम्ही विसरलो नाहीत, जोपर्यंत काँग्रेसचे नेते व पदाधिकारी आणीबाणीवर बोलत नाही तोपर्यत आम्ही जाब विचारत राहू, असेही डॉ. पवार यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गोविंद बोरस्ते, प्रवीण अलई, नाना शिलेदार आदी उपस्थित होते.

कांद्याची नियमित तपासणी

नाफेडकडून लासलगाव येथे कांद्याची तपासणी संदर्भात डॉ. पवार म्हणाल्या, की अशा प्रकारची नियमीत तपासणी सुरू असते. केंद्र सरकारकडून कांदाप्रश्नावरून नेहमीच तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. तक्रारीनंतर यापूर्वीही लगेचच कारवाई होत होती. परंतु विरोधकांनी कांदाप्रश्नावर राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. भास्कर भगरे लोकसभेत चुकीच्या लोकांसोबत बसले असून, षडयंत्रात अडकलेले खासदार असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT