Dr Harshal Tambe  esakal
नाशिक

Coffee with Sakal : 'SMBT'त परवडणार्या दरांत जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा : डॉ. हर्षल तांबे

सकाळ वृत्तसेवा

Coffee with Sakal : एकदा रुग्‍ण 'एसएमबीटी'च्‍या प्रवेशद्वारातून आत आल्‍यास आर्थिक परीस्‍थिती कशीही असो, त्‍याला उपचाराची हमी निश्‍चित असते. रोजच सुमारे साठ गुंतागुंतीच्‍या, क्‍लिष्ट शस्‍त्रक्रिया रुग्‍णालयात पार पडत आहेत. सर्वसामान्‍यांना परवडणारी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा कायम ध्यास राहिला आहे, अशी भावना 'एसएमबीटी'चे व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त डॉ.हर्षल तांबे यांनी व्‍यक्‍त केली. ( World class medical services at affordable rates in SMBT )

'अफोर्डेबल हेल्‍थ केअर', 'ॲकॅडकमीक एक्‍सलन्‍स', 'ग्रेट प्‍लेस टु वर्क' या त्रिसुत्रीवर संस्‍थेची पुढील वाटचाल रहाणार असल्‍याची ग्‍वाही त्यांनी दिली. 'सकाळ'च्‍या सातपूर कार्यालयात आयोजित 'सकाळ-संवाद' या उपक्रमातून त्‍यांनी मनामेकळ्या कप्पा मारतांना संस्‍थेच्‍या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी डॉ.तांबे यांचे स्‍वागत 'सकाळ'च्‍या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले.

डॉ. हर्षल तांबे म्‍हणाले, की आदिवासी, दुर्गम भागातील जनतेल आरोग्‍य सेवा पुरविण्यासाठी सुरु केलेल्‍या या हॉस्‍पिटलचा फायदा राज्‍यभरातील रुग्‍णांना होतो आहे. प्रारंभीच्‍या टप्‍यात नाशिकमधील खासगी रुग्‍णालयातील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांना विनंती करुन हॉस्‍पिटलमध्ये बाह्य रुग्‍ण विभाग सक्रिय झाला. शिबिरांचे आयोजन करतांना नागरिकांना सहभागी करुन घेतले. गुणवत्तापूर्ण आरोग्‍य सेवेतील सातत्‍य राखल्‍याने आज मुंबईसारख्या प्रगत शहरासमवेत आसाम सारख्या राज्‍यातूनही तज्‍ज्ञ डॉक्‍टर रुग्‍णेसेवेसाठी 'एसएमबीटी'सोबत जोडले गेले आहेत.

९५ टक्‍के समाजकारण व ५ टक्‍के राजकारण असेच सूत्र तांबे आणि थोरात कुटुंबीयांनी जोपासले आहे. म्‍हणून निवडणुका आल्‍या की राजकारण व निकाल जाहीर होताच समाजकार्याला सुरुवात केली जाते. आजोबा भाऊसाहेब थोरात यांच्‍या प्रेरणेतून आणि माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्‍या मार्गदर्शनाखाली हॉस्‍पिटल उभारले आहे. ऊसतोड कामगार व दुर्गम भागातील जनतेपर्यंत आरोग्‍यसेवा पुरविण्याच्‍या उद्देशाने सुरु केलेल्या या हॉस्‍पिटलमध्ये आज शहरी, ग्रामीण अशा सर्व रुग्‍णांना परवडणार्या दरांमध्ये जागतिक दर्जाच्‍या वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध झाल्‍या आहेत. (latest marathi news)

वैद्यकीय शिक्षणादरम्‍यान गिरविले व्‍यवस्‍थापनाचे धडे

डॉ.हर्षल तांबे म्‍हणाले, की मविप्र डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेत असतांनाच प्रशासकीय व व्‍यवस्‍थापनाच्‍या क्षेत्रात योगदान देण्याचा निर्धार केलेला होता. त्‍यानुसार महाविद्यालयीन जीवनात डॉ.वसंत पवार यांच्‍या प्रेरणेतून विद्यार्थी नेतृत्‍व करतांना वैद्यकीय शिक्षणासोबत व्‍यवस्‍थापनाचे धडे गिरविले.

हॉस्‍पिटलमध्ये विक्रमी शस्‍त्रक्रिया

एसएमबीटी हॉस्‍पिटलमध्ये दैनंदिन सुमारे साठ शस्‍त्रक्रिया पार पडतात. त्‍यासाठी चौदा सुसज्‍ज ऑपरेशन थिएटर कार्यान्‍वित आहेत. मार्चमध्ये विक्रमी एक हजार ४५० शस्‍त्रक्रिया करतांना रुग्‍णांना दिलासा दिलेला आहे. महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत शस्‍त्रक्रियांच्‍या संख्येत हॉस्‍पिटलचा राज्‍यातील अव्वल रुग्‍णालयांच्‍या यादीत समावेश होत असल्‍याची समाधानकारक बाब असल्‍याचे डॉ.तांबे म्‍हणाले.

त्रिसुत्रीवर वाटचाल करणार..

'अफोर्डेबल हेल्‍थकेअर', 'ॲकॅडमीक एक्‍सलन्‍स' आणि 'ग्रेट प्‍लेस टु वर्क' या त्रिसुत्रीवर संस्‍था वाटचाल करत आहे. कॅम्‍पसमध्ये आलेला रुग्‍ण यशस्‍वी उपचार घेऊनच बाहेर पडावा असा आमचा ध्यास आहे. यासोबत वैद्यकीय पदवी व पदव्‍युत्तर महाविद्यालय, दंतशास्‍त्र महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, फिजिओथेरेपी, औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालय असे विविध नऊ युनीट कार्यरत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता नेहमीच उच्चावत नेण्याचा उद्देश आहे.

तर संस्‍थेचा डोलारा सांभाळतांना हातभार लावणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कामासाठी पोषक वातावरण उपलब्‍ध करुन देतांना 'ग्रेट प्लेस टु वर्क' मानांकन प्राप्त करण्याचाही मानस डॉ.तांबे यांनी व्‍यक्‍त केला. आत्तापर्यंत कार्पोरेट कंपन्‍यांमध्येच 'ग्रेट प्‍लेस टु वर्क'चे मानांकन घेतले जात असून, एसएमबीटी ही पहिली शैक्षणिक संस्‍था ठरेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

समृद्धीमुळे राज्‍यभरातून रुग्‍ण हॉस्‍पिटलमध्ये दाखल

समृद्धी महामार्गामुळे राज्‍यभरातील रुग्‍णांना एसएमबीटी हॉस्‍पिटलमध्ये उपचार घेण्यास सहाय्यता झाली आहे. विविध चौदा जिल्‍ह्‍यातील रुग्‍णांना महामार्गावरुन काही तासांत हॉस्‍पिटलपर्यंत पोहचणे शक्‍य झाले. महामार्गावर एकमेव ट्रॉमाकेअर सेंटर म्‍हणून हॉस्‍पिटलची भूमिका महत्‍वाची आहे. याशिवाय भिवंडी, शहापुर, संगमनेर, नाशिक शहर या भागातून रोज बसगाड्या सुरु असून, रुग्‍णांची यामुळे सुविधा झाली असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

अन्‌ 'टाटा'ने प्रथमच केली खासगी संस्‍थेसोबत भागिदारी

कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असतांना या शाखेतही आरोग्‍य सुविधा पुरविण्याचा एसएमबीटीचा ध्यास होता. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावाजलेल्‍या टाटा मेमोरीयल सेंटरसोबत संपर्क साधला. व प्रथमच टाटा मेमोरीयल सेंटरने खासगी संस्‍थेसोबत ऐतिहासिक सामंजस्‍य करार करतांना सेवेचा विस्‍तार केलेला आहे. त्‍यामुळे एसएमबीटी कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूटच्‍या माध्यमातून कर्करोगावर प्रभावी, दर्जेदार उपचार उपलब्‍ध होणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातील कर्करोगग्रस्‍तांना दिलासा मिळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

डॉ.हर्षल तांबे म्‍हणाले...

* एसएमबीटी क्‍लिनिकद्वारे शहरी भागात आरोग्‍यसेवा

* नाशिकसह भिवंडी, शहापुर, संगमनेरला क्‍लिनिक कार्यान्‍वित

* बालकांच्‍या जन्‍मजात हृदयविकारावर प्रभावी उपचार उपलब्‍ध

* मान्‍यता मिळाल्‍याने लवकरच प्रत्‍यारोपणाच्या शस्‍त्रक्रियांना सुरुवात

* 'पीएम केअर फंड'च्‍या मान्‍यतेसाठी प्रयत्‍न, रुग्‍णांना मिळणार आर्थिक आधार

* दुर्धर आजारांनी ग्रासलेल्‍या ज्‍येष्ठांसाठी पॅलेटिव्‍ह केअर ठरतेय महत्त्वाची

* 'एसएमबीटी केअर प्‍लस'द्वारे सुसज्‍ज वैद्यकीय सुविधांची उपलब्‍धता

* 'राईज'द्वारे संकुलात शिकणार्या विद्यार्थ्यांना मानसिक बळ उपलब्‍ध

* शिक्षणासोबत कला, क्रीडा गुण विकसीत करण्यावर राहातो भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT