T. K. D. Senior scientist Dr. Omprakash Kulkarni. esakal
नाशिक

Nashik News : व्यावसायिकदृष्ट्या मूल्‍य असलेले संशोधन करा : डॉ. कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : समाजात वावरताना अनेक समस्‍या आपल्‍या निदर्शनास येतात. या प्रत्‍येक समस्‍येचे समाधान काढताना पेटंट मिळविण्याची संधी आहे. केवळ पेटंट मिळविणे महत्त्वाचे नसून, त्‍याचा व्‍यावसायिक उपयोग झाल्‍यास रॉयल्‍टीच्‍या माध्यमातून उत्‍पन्न मिळू शकते. त्‍यामुळे व्यावसायिकदृष्ट्या मूल्‍य असलेले संशोधन करावे, असे आवाहन ज्‍येष्ठ शास्‍त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी शनिवारी (ता.९) केले. (Nashik Dr Kulkarni statement on Do research with commercial value marathi news )

गंगापूर रोडवरील व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शास्‍त्रज्ञ होण्यासाठी प्रोत्‍साहन देण्याच्‍या उद्देशाने टी.. के. डी. फाउंडेशन, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍था आणि नाशिक एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍यातर्फे ‘गप्पा वैज्ञानिकांशी’ या टॉक शोचे आयोजन केले होते.

‘सकाळ’ या कार्यक्रमासाठी माध्यम प्रायोजक होते. डॉ. कुलकर्णी म्‍हणाले, की संशोधनात कठोर मेहनत घेणे आवश्‍यक ठरते. बऱ्याचवेळा आपल्याकडील पैसे हे खाण्यापिण्यासाठी वापरायचे की संशोधनासाठी उपयोगात आणायचे? असा प्रश्‍न उद्‌भवू शकतो.

अशा परिस्थितीत घेतलेला निर्णय आपल्‍या भविष्यासाठी परिणामकारक ठरू शकतो. पेटंट मिळविण्याची प्रक्रिया व एखादे पेटंट रद्द करण्यासंदर्भातील प्रक्रियेतील अनुभवांचे कथन करताना त्‍यांनी विद्यार्थ्यांच्‍या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देत शंकांचे समाधान केले. कार्यक्रमात ॲड. लीना ठाकूर व रवींद्र भारोटे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास टी.. के. डी. फाउंडेशनचे सुदाम धनवटे, व्‍ही. एन. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप, औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश दरेकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास चंद्रात्रे उपस्‍थित होते. कार्यक्रमाचे निवेदन करताना रवींद्र शास्‍त्री यांनी सूत्रबद्ध पद्धतीने कार्यक्रम पुढे नेला. (latest marathi news)

बुद्धीच्‍या जोरावर पेटंटरुपी संपत्ती कमवाः भारोटे

श्री. भारोटे म्‍हणाले, की जमीन, फ्‍लॅट यांसारख्या स्‍थावर मालमत्तांसाठी आपल्‍याला पैसे मोजावे लागतात. परंतु या मालमत्तांइतकेच मौल्‍यवान हे पेटंट ही एक प्रकारची मालमत्ता (इनटँजीबल ॲसेट) आहे. बुद्धीच्‍या जोरावर पेटंट रुपी संपत्ती कमवताना श्रीमंत होण्याचा सल्‍ला त्‍यांनी उपस्‍थित विद्यार्थ्यांना दिला.

ज्‍याप्रमाणे घर भाडेतत्त्वावर देऊन भाडे रुपी उत्‍पन्न मिळते. त्‍याप्रमाणे पेटंटचे व्यावसायिकीकरण करून त्‍याद्वारे उत्‍पन्न मिळविता येऊ शकते, असे त्‍यांनी नमूद केले. संशोधन कार्य चोरी होण्याचे संभाव्‍य धोके सांगताना पेटंट प्रक्रियेविषयी त्‍यांनी सखोल मार्गदर्शन केले.

ब्रँड घडविण्यात संशोधनाची भूमिका महत्त्वाची डॉ.ठाकूर

सादरीकरणातून ॲड. लीना ठाकूर यांनी पेटंट मिळविण्याचे टप्पे व इतर प्रक्रियेविषयीची माहिती दिली. त्‍या म्‍हणाल्‍या, की कुठल्‍याही कंपनीला ब्रँड बनविण्यात संशोधन महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्‍येक व्‍यवसायाच्‍या यशस्‍वीतेचे एक गुपित असते. त्‍यासाठी बहुतांश व्‍यावसायिक पेटंटच्‍या रूपाने हक्‍क राखून ठेवताना आपल्‍या व्‍यवसायात नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्‍न करतात.

त्‍यामुळे स्‍टार्ट अप्‍सच्‍या माध्यमातून मोठा व्‍यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या युवा उद्योजकांनी जास्‍तीत जास्‍त पेटंट दाखल करत बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. तसेच अगदी कविता, लेखांपासून तर इतर गोष्टींचे कॉपीराइट मिळविताना त्‍याबाबतचे अधिकार राखून ठेवण्याबाबतही त्‍यांनी सुचविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT