Health Checkup  esakal
नाशिक

Ayushman Health Checkup : ‘आयुष्यमान हेल्थ चेकअप’चा 50 हजाराचा टप्पा पूर्ण : डॉ. वडगावकर

Ayushman Health Checkup : लक्षणे दिसल्यानंतर उपचारांसाठी धाव घेण्याऐवजी लक्षणे नसताना नियमित आरोग्य तपासणीतून संभाव्य आजाराचे वेळेत निदान होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

Ayushman Health Checkup : लक्षणे दिसल्यानंतर उपचारांसाठी धाव घेण्याऐवजी लक्षणे नसताना नियमित आरोग्य तपासणीतून संभाव्य आजाराचे वेळेत निदान होऊ शकते. यामुळे उपचार कमी खर्चात होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. या भूमिकेतून 'आयुष्यमान हेल्‍थ चेकअप' या मोहिमेतून आत्तापर्यंत पन्नास हजार रुग्‍णांची तपासणी केली असल्‍याची माहिती डॉ.अतुल वडगावकर यांनी शुक्रवारी (ता.१) पत्रकार परिषदेत दिली. (nashik Ayushman Health Checkup completed in city marathi news)

डॉ.वडगावकर म्‍हणाले, की आरोग्य तपासणी ही सामाजिक चळवळ होण्याची आवश्‍यकता आहे. सुमारे २२ वर्षांपूर्वी 'आयुष्यमान हेल्थ चेकअप'ला सुरवात केली होती. नियमित आरोग्य तपासणी केल्यास रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच अनेक रोगांना प्राथमिक स्तरावरच ओळखणे शक्य होते.

यामुळे आरोग्य तपासण्या करण्यासाठी अल्प दरातील आयुष्यमान हेल्थ चेकअपची सुरवात केली होती. यामुळे अनेक रुग्णांचे गंभीर आजारांचे निदान प्राथमिक स्वरूपात केल्याने रुग्ण बरे झाले. (latest marathi news)

मुख्यतः सामाजिक भावनेतून हा उपक्रम सुरू झाला असून आजही या सर्व तपासण्या एकूण खर्चाच्या केवळ वीस टक्‍के दरात केल्‍या जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मोहिमेबाबत जनजागृती झालेली असल्‍याने यापुढील पन्नास हजारांचा टप्पा लवकर पूर्ण होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

उद्या 'संचित जीवनाचे' कार्यक्रम

आरोग्‍य तपासणीत पन्नास हजारांचा टप्पा गाठल्‍याबद्दल यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.३) सायंकाळी पाचला कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृह येथे 'संचित जीवनाचे' हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास ज्‍येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्‍याचे डॉ. पूजा वडगावकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

SCROLL FOR NEXT