A vendor selling dragon fruit at the fruit market in Sardar Chowk here. esakal
नाशिक

Dragon Fruit : कसमादेतील ड्रॅगन फ्रुटची मालेगावकरांना भुरळ! 150 ते 200 रुपये किलो दराने विक्री

Dragon Fruit : फळफळावळ बाजारात आंबा, ड्रॅगन, पेरू, केळी, ओली खजूर, चिकू, पपई, सफरचंद, मोसंबीसह अनेक फळे विक्रीस येत आहे.

जलील शेख

Dragon Fruit : येथील फळफळावळ बाजारात आंबा, ड्रॅगन, पेरू, केळी, ओली खजूर, चिकू, पपई, सफरचंद, मोसंबीसह अनेक फळे विक्रीस येत आहे. यामध्ये सध्या ड्रॅगन फ्रुटने मालेगावकरांना भुरळ घातली आहे. येथे रोज पाच टन ड्रॅगन फ्रुट विक्री होत आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून येथे ड्रॅगनची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या येथे घाऊक बाजारात ड्रॅगन ९० ते १०० रूपये किलोने, तर किरकोळ बाजारात दीडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात आहे. (Dragon fruit in Kasmade is popular in Malegaon people )

त्यामुळे येथे प्रत्येक हातगाडीवर ड्रॅगन दिसत आहे. यात लाल रंगाच्या ड्रॅगन फळाला मागणी आहे. कसमादे परिसरात २०१९ पासून मोठ्या प्रमाणात ड्रॅगनची लागवड केली जात आहे. सुमारे ५० हेक्टरवर ड्रॅगनची लागवड झाल्याचा अंदाज आहे. येथे बाजारात दोन प्रकारचे ड्रॅगन विक्रीला येत आहे. किरकोळ बाजारात दीडशे रुपये किलोने विक्री होते. येथील बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून ड्रॅगन विक्रीस येत आहे.

सध्या सुमारे पाच टन ड्रॅगनची विक्री होत आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना ड्रॅगन लागवडीस हेक्टरला १ लाख ६० हजारांचे अनुदान दिले जात आहे. ड्रॅगन लागवड केल्यापासून दीड वर्षात फळे येण्यास सुरवात होत आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात प्रत्येक हातगाडीवर ड्रॅगन दिसत आहे. डिसेंबरच्या शेवटपर्यंत ड्रॅगन बाजारात दिसणार असल्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. (latest marathi news)

''ड्रॅगन लागवडीकरीता शासनातर्फे हेक्टरी एक लाख ६० हजार रुपये अनुदान दिले जाते. यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने नावे काढली जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.''- भगवान गोर्डे, तालुका कृषि अधिकारी, मालेगाव

''गेल्या अठरा वर्षांपासून ड्रॅगनची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन घेतले जातात. सिझनला एका झाडापासून सुमारे दोनशे किलोफळ काढले जाते. यात सर्वात जास्त लाल रंगाच्या फळाला मागणी असते. तसेच, पाढंऱ्या फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे.''- कैलास कचवे, ड्रॅगन उत्पादक, दहिदी (ता. मालेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT