Nashik News : चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणताहेत, शहरातील नालेसफाई पूर्ण झालीय, मग तरीही शहरातील नाले व गटारी तुंबलेल्या कशा? नालेसफाई फक्त कागदावरच झाली की काय हा प्रश्न चांदवडकरांना पडलाय. चांदवड शहरातील नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले तर गटारी तुंबलेल्या आहेत. (Drain cleaning in Chandwad only on paper)
यामुळे शहराच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्याधिकारी अन् प्रशासन शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहणार आहे की नाही असा प्रश्न सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे. ‘स्वच्छ भारत...स्वच्छ शहर' चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे.
मात्र शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात आजारांनी तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई होणार आहे का नाही असा नागरिकांचा प्रश्न आहे.
शहरासाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून दिसून येतोच. शहरातील अनेक भागातील नाले घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. (latest marathi news)
शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे नगरपरिषद स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे हे दाखवून देते. शहरात असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे शहरवासीयांना भोगावे लागतील.
जबाबदार कोण, प्रशासनच?
नागरिक प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जीविताशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.