जुने नाशिक : ड्रेनेज लाईन फुटल्याने चेंबरमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाजारपेठेतील रस्त्यावर आल्याने बोहरपट्टी, मेनरोड बाजारपेठेत सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना तोंडास रुमाल लावण्याची वेळ आली. याबाबत व्यावसायिक तसेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Nashik drainage line in market burst marathi news)
शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून मेनरोड परिसराची ओळख आहे. अशा मुख्य बाजारपेठेच्या भागातील ड्रेनेज लाईन मंगळवारी (ता.१९) अचानक फुटली. रविवार कारंजापासून मेनरोडकडे उतरणाऱ्या मार्गावर असलेल्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी बाहेर पडले.
रविवार कारंजा परिसर, बोहरपट्टी आणि मेनरोड रस्त्यावर हे सांडपाणी वाहू लागले. सर्वाधिक सांडपाणी बोहरपट्टीतून सराफ बाजाराच्या दिशेने वाहत गेले. होळीनिमित्ताने लागलेली हार, कडे पूजा साहित्याची दुकाने सांडपाण्याच्या कचाट्यात सापडली. नुकसान होण्याच्या भीतीने व्यावसायिकांना त्यांची दुकाने उचलून घेण्याची वेळ आली.
वाहणाऱ्या सांडपाण्याने संपूर्ण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली. व्यावसायिक आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना तोंडास रुमाल, मास्क तर महिलांना ओढणी, साडीचा पदर तसेच स्कार्फ तोंडाला बांधून तेथून मार्ग काढावा लागला. . (latest marathi news)
ड्रेनेज लाइनची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने अशा प्रकारची वेळ आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. झालेल्या मनस्तापाने व्यावसायिकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बोहरपट्टी भागात फेरीवाले व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवणेच पसंत केले.
स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामाचा गाजावाजा करत शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अशा दुर्लक्षित कामांमुळे स्मार्ट सिटी कामांचे धिंडवडे निघत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला.
पुन्हा तोंडास आले रुमाल
तीन वर्षांपूर्वी शहरातील कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्या नाका, तोंडास मास्क, रुमाल, स्कार्फ आढळून येत होते. तशाच प्रकारचे दृश्य मंगळवारी मेनरोड, रविवार कारंजा, बोहरपट्टी भागात बघावयास मिळाले. कोरोनामुळे नाही तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाजारपेठेत पसरल्याने ही वेळ आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.