Nashik Road railway station esakal
नाशिक

Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याचे हाल! शुद्ध पाण्याचे मशिन बसवाण्याची नागरिकांची मागणी

Nashik News : नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशनच्या चारही प्लॅटफॉर्मवर शुद्ध पिण्याचे पाण्याचे मशिन बसवा, अशी मागणी सध्या नागरिक करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : येथील रेल्वे स्टेशनच्या चारही प्लॅटफॉर्मवर शुद्ध पिण्याचे पाण्याचे मशिन बसवा, अशी मागणी सध्या नागरिक करीत आहेत. थंड पिण्याच्या पाण्याचे मशिन नसल्यामुळे प्रवाशांना एक लिटर बाटलीसाठी पंधरा ते वीस रुपये खर्च येत असून रेल्वेने येणारा उन्हाळा लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे. (Nashik Drinking water problem at Nashik Road railway station marathi news)

नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून रोज किमान ४७ ते ५० गाड्या या रेल्वे स्टेशन वरून मार्गक्रमण करतात. येथे चारही प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यासाठी शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी मशिन बसवावे, अशी मागणी होत आहे. सध्या सिमेंटने बांधलेली पाण्याची टाकी आहे. मात्र यामध्ये अनेकवेळा शुद्ध पाणी नसते शिवाय गरम पाणी नागरिकांना प्यावे लागते. स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मशिन बसवण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (latest marathi news)

"रेल्वे स्टेशनच्या चारही प्लॅटफॉर्मवर सध्या पिण्याच्या पाण्याची गरज आहे. मुबलक प्रमाणात मशिन बसून नागरिकांना थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यायला हवे. प्रवासी कर भरतात मात्र त्यांना सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कडकडीत उन्हाळ्यात सध्या पिण्याच्या पाण्याची वाणवा जाणवत आहे."- गोविंद तुपे (जीव रक्षक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT