As soon as the water tanker arrived at the tribal settlement, there was a rush to fill the water esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : जूनमध्येच सुरू केलेले टँकर कायम

Nashik News : नांदगाव तालुक्याच्या भाळी दुष्काळ तसा कायमचाच. तालुक्यात गेल्या वर्षी नऊ जूनला नवसारी, बोयगाव, शास्त्रीनगर या तीन गावांना टँकर सुरु झाले.

संजीव निकम

नांदगाव : नांदगाव तालुक्याच्या भाळी दुष्काळ तसा कायमचाच. तालुक्यात गेल्या वर्षी नऊ जूनला नवसारी, बोयगाव, शास्त्रीनगर या तीन गावांना टँकर सुरु झाले, त्यानंतर लगेचच खादगाव, धोटाणे खुर्दला दहा दिवसात टँकर सुरु करावे लागले, तेव्हापासून टॅंकर सुरु झालेल्या तालुक्यातील गावांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेली. तालुक्यात एकूण ८५ गावे आहेत, त्याच्या निम्म्याहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय. (drought of Nandgaon taluka increase)

जून ते जून असा वर्षभर सर्वाधिक संख्येने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असलेला नांदगाव तालुका हा जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. पाऊस नाही, विहिरी आटल्या, धरणे कोरडीठाक पडलेली अशी अवस्था तशी नेहमी अधूनमधून उद्भवत असते. गेल्या आठवड्यात वळिवाचा पाऊस आला अन टँकरवरची भिस्त कमी होईल असे वाटू लागले असले तरी नव्याने पुन्हा दहा गावांच्या टँकरच्या प्रस्ताव पाठवावा लागला.

यावरून तालुक्यात उदभवलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष् किती गंभीर स्वरूपाचे आहे हे लक्षात यावे. एकीकडे दुष्काळाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील नळयोजनाची स्थिती नाजूक असल्यामुळे सगळी भिस्त आता टँकरवर विसंबून आहे. ग्रामीण भागातील महिला पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या विहिरी शोधण्यासाठी पायपीट करतात, त्यांचा तो नित्यक्रम बनलाय.

कारण टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. एक ते दीड किलोमीटरवरच्या विहिरीवर जाऊन पाणी लांबून पाणी भरायला यावं लागते. दिवसभर घरातली कामे करायची, मजुरीला जायचे, घरी थांबले कि पाण्याचे टँकर आले कि धावपळ उडते. ज्या विहिरीत टँकरचे पाणी टाकले जाते तेथून ते पाणी पुन्हा शेंदताना दम लागतो. हातापायाला गोळे येतात, ओझं वाहून आणल्याने मान दुखते. सगळे अंग दुखते, अशा बहुतांशी तक्रारी ग्रामीण महिलांच्या बोलण्यातून पुढे आल्या. (latest marathi news)

टॅंकरचे काही अनुत्तरित प्रश्न

तालुक्यात होत असलेला टँकरचा पाणीपुरवठा नियमित होत असला तरी तो पुरेसा नाही. ओरड कायम आहे. प्रत्येक टँकरला ठरवून दिलेल्या खेपा नियमित व सुरळीत व पुरेशा दाबाने होतात का हा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. त्यातच या पाण्यात टाकले जाणारे, टिसीएल, तुरटी हे देखिल योग्य प्रमाणात आहे का? नियमित व वेळेत पाणी पोहचते का? त्यानंतर ते पाणी नागरिकांना योग्य पध्दतीने पुरवठा होतो का हे देखील महत्वाचे आहे. शिवाय सुरु असणाऱ्या टँकरमधून होणारी गळती ही एक वेगळी डोकेदुखी आहे

६९ टॅंकरच्या दररोज १६१ खेपा

तालुक्यातील गेल्या वर्षभरात टँकरवरचा खर्च पोहचलाय दहा कोटीच्या घरात. ६४ गावे ३३३ वाड्यावस्त्यांना ६९ टँकरच्या दररोजच्या १६१ खेपा सुरूच आहेत. बहुतांशी गावांच्या नळयोजना विस्कळीत असून गिरणा धरणावरील ५६ खेडी नळयोजनेच्या वारंवार तांत्रिक बिघाडामुळे आवर्तनाचा कालावधी महिनाआड पाणी वितरण अशा स्वरूपाचा झाला आहे. नव्या योजनांचे काम प्रगतीपथावर असले तरी जुन्या योजनांच्या दुरुस्ती देखभालीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याने शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात जारचे पाणी विकत घेण्याकडे कल वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT