Drunk and drive action against drunken drivers by the police on Sunday (4th) in the commissionerate area. esakal
नाशिक

Nashik News : अवघ्या 18 मद्यपी चालकांविरोधात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दीपअमावस्येला (गटारी) ओल्या पार्ट्यां करण्याची धूम असताना शहर पोलिसांना शनिवारी, रविवारी या दोन दिवसात फक्त १८ चालकच मद्यपान करून वाहन चालवित असल्याचे आढळून आल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे. या १८ मद्यपी वाहनचालकांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करीत १ लाख ८० हजारांचा दंड करण्यात आला आहे. तसेच, या मद्यपी वाहनचालकांचे परवानेही निलंबित करण्यासाठी आरटीओला शहर पोलिस अहवाल पाठविणार आहेत. (Drunk and drive against 18 drunken drivers in city )

दीपअमावस्या रविवारी असल्याने तळीरामांना शनिवार, रविवार असे दोन दिवस ओली पार्टी करण्याची आयतीच संधी मिळाली होती. त्यातच पावसाचा जोर असला तरी तळीरामांचा उत्साह कमी झालेला नव्हता. उलट शहरातील वाईनशॉप बाहेर मद्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले होते.

मद्यपान करून वाहने चालवून पादचाऱ्यांसह दुसऱ्या वाहनचालकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणार्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शनिवारी, रविवारी आयुक्तालय हद्दीमध्ये पोलीस ठाणेनिहाय व वाहतूक शाखेतर्फे सायंकाळी ६ ते रात्री उशिरापर्यत नाकाबंदी करीत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. यासाठी पोलिसांना तळीरामाच्या मद्याच्या प्रमाणाची चाचणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर देण्यात आलेले होते.

त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शानाखाली मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या चालकांविरुध्द पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार, या मोहिमत आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस , वाहतूक शाख, गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होत मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

या मोहिमेंतर्गत १८ मद्यपी वाहनचालकांविरोधात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हअंतर्गत कारवाई करीत, नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल केले आहेत. त्यानुसार न्यायालयाने प्रत्येकी १० हजार याप्रमाणे १ लाख ८० हजारांचा दंड या मद्यपी वाहनचालकांविरोधात आकारला आहे. परंतु, दुसरीकडे या दोन दिवसात कोट्यवधींच्या मद्याची विक्री शहरात झालेली असताना अवघे १८ वाहनचालक मद्याच्या नशेत आढळून आल्याचे आश्यर्च जागरुक नागरिक व्यक्त करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT