Citizens performing pooja after purchasing a vehicle on the occasion of Vijayadashami esakal
नाशिक

Nashik Dasara Shopping : दसरामुळे वाहन बाजार तेजीत! 150 कोटींची उलाढाल; इलेक्ट्रॉनिक वाहनांना सर्वाधिक पसंती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dasara Shopping : साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याला वाहन बाजारात तेजी दिसून आली आहे. दसऱ्याचा मुहुर्त साधत नाशिककरांनी चारचाकी, दुचाकी तसेच इलेक्ट्रॉनिक वाहनांचा पसंती दिली. विजयादशमीनिमित्त वाहन बाजारात दिवसभरात १५० कोटींची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (Due to Dasara vehicle market booming)

नाशिकच्या वाहन बाजारातील उलाढाल कृषी क्षेत्रावर बऱ्यापैकी अवलंबून असल्याने, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्रात काहीसे भरभराटीचे वातावरण आहे. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली गेली होती.

यात, दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी शुभ मानली जात असल्याने अन् यंदा तुलनेत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने वाहन बाजारात कमालीचा उत्साह दिसून आला. सर्वच आघाडीच्या वाहन कंपन्यांनी अद्ययावत सोयी-सुविधा असलेली वाहने बाजारात आणली आहेत. चारचाकींमध्ये एसयूव्ही, तर दुचाकींमध्ये स्पोर्ट्स बाइकला अधिक पसंती मिळत आहे.

काही चारचाकींच्या मॉडेल्सला तीन महिन्यांपेक्षा अधिक वेटिंग असल्याने, ग्राहकांनी यापूर्वीच वाहनांची बुकिंग करून ठेवली होती. बहुतांश ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्त साधत शनिवारी (ता.१२) वाहनांची डिलिव्हरी घेतली. एक हजाराहून अधिक चारचाकी वाहनांची डिलिव्हरी झाली तर, तीन हजारांहून अधिक दुचाकी वाहनांची नाशिककरांनी खरेदी केली. (latest marathi news)

इलेक्टॉनिक वाहनांना पंसती

वाहन बाजारात ईव्ही वाहनांची क्रेझ वाढल्याचेही दिसून आले. विक्रेत्यांच्या मते इंधनावरील वाहन विक्रीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक विक्री ईव्ही वाहनांची झाली. चारचाकींमध्ये ५० पेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक चारचाकी डिलिव्हरी देण्यात आली. तर तब्बल पाचशे ईव्ही दुचाकींची विक्री झाली.

चारचाकी - १००० (५०)

दुचाकी - ३००० (५००)

"यंदा समाधानकारक पाऊस असल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा उत्साह दिसत आहे. वाहन खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीपर्यंत हे वातावरण कायम राहील." -शिवांग बटाविया, हिरो शोरूम, नाशिक

"वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद असून चारचाकी वाहने घेण्याकडे कल वाढला आहे. साधारण: ५० वाहनांची दिवसभरात डिलिव्हरी झाल्याचा अंदाज आहे. दिवाळीची बुकिंग देखील चांगली झाली आहे." - सोनल चौधरी, उज्वल अॅटोहब प्रा. लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Mumbai News: मुंबई हादरली! भाजप माजी खासदाराच्या पुतण्याने संपवलं जीवन, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

SCROLL FOR NEXT