Lok Sabha Exit Poll 2024  esakal
नाशिक

Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलने मालेगावात ‘कही खुशी-कही गम!’

Exit Poll : मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे मालेगावात मात्र ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे.

गोकुळ खैरनार

Lok Sabha Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे २४ तास शिल्लक आहेत. मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे मालेगावात मात्र ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सरकार येणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसून आल्याने कॅम्प-संगमेश्‍वरसह मालेगाव बाह्य मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. मुस्लिमबहुल ‘मालेगाव मध्य’मध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. (exit polls released after polls there is atmosphere of happy and sad )

केंद्रात एनडीए सरकार येणार असले तरी किमान धुळे लोकसभेत काँग्रेसचा विजय व्हावा, अशी आस अनेक जण लावून बसले आहेत. एकूणच एक्झिट पोलमुळे मालेगावात ‘कही खुशी- कही गम’ असे वातावरण आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ‘मालेगाव बाह्य’ सातत्याने भाजप उमेदवाराच्या पाठीशी राहिला आहे.

तर ‘मालेगाव मध्य’ पूर्ण ताकदीने काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने राहतो. या निवडणुकीत ‘मालेगाव बाह्य’मध्ये काही प्रमाणात वातावरण बदलले. गेल्या निवडणुकीएवढी आघाडी टिकविण्याचे आव्हान भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यापुढे असेल. समीकरणे कितीही बदलली तरी डॉ. भामरे यांनाच ‘मालेगाव बाह्य’मधून आघाडी मिळेल. (latest political news)

मात्र ती किती असेल, याबाबत साशंकता आहे. एक्झिट पोलनंतर भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रात ‘एनडीए’चे सरकार येणार असल्याने डॉ. भामरे निवडून आल्यास विकासकामांसाठी त्याचा फायदा होईल, अशी चर्चा आहे. अनेकांची परिस्थिती दोलायमय झाली आहे.

एक्झिट बोल बकवास है

‘मालेगाव मध्य’मध्ये मात्र वेगळेच वातावरण आहे. ‘मालेगाव मध्य’ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे. या वेळीही येथे काँग्रेस उमेदवाराला जबरदस्त मतदान झाले आहे. अनेक जण एक्झिट पोलवर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. ये सब बकवास है अशा प्रतिक्रिया या भागातून रविवारी (ता. २) फेरफटका मारल्यानंतर ऐकायला मिळाल्या. केंद्रात ‘इंडिया आघाडी’चेच सरकार येईल, असा त्यांना विश्‍वास आहे.

भाजपचा पराभव झाला पाहिजे. मोदींना झटका बसला पाहिजे, असा मतप्रवाह दिसून आला. सत्तारुढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांना समाधानकारक जागा मिळतील, असा दावाही ‘मालेगाव मध्य’मध्ये केला जात आहे. काहींच्या मते देशात काहीही हो धुळ्यातून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव निवडून आल्या पाहिजेत, अशा चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT