politicians  esakal
नाशिक

Nashik News: सरपंच-उपसरपंचांना निवडणुकीपूर्वीच गिफ्ट! मानधन वाढीमुळे जिल्ह्यातील गावकारभाऱ्यांना मिळणार सुमारे दीड कोटी

सकाळ वृत्तसेवा

येवला : सरपंच-उपसरपंचांच्या मानधनात पाच वर्षांनंतर दुपटीने वाढ करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील एक हजार ३७३ सरपंच-उपसरपंचांना होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून मिळालेले हे गिफ्ट मानले जात आहे. विद्यमान कारभाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. नव्या निर्णयानुसार जिल्ह्यातील गावांच्या कारभाऱ्यांना महिन्याला सुमारे दीड कोटीच्या आसपास मानधन मिळणार आहे. (increase in salary village officials of district get extra pay)

कारभाऱ्यांना बदलत्या काळात वाढत्या जबाबदाऱ्या सरकारने दिल्याने वेळ देऊन कामकाज पाहावे लागते. किंबहुना अनेक सरपंच-उपसरपंच तर पूर्णवेळ गावासाठी वाहून घेतात. या बदल्यात शासनाकडून दमदार मानधन मिळावे, अशी अपेक्षा असल्याने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मानधनात वाढ करून उपसरपंचांनांही मानधन सुरू केले होते.

शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वी पोलिस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ केल्यानंतर सरपंच संघटनेकडूनही मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कारभाऱ्यांना गिफ्ट देऊन खूश केले आहे. (latest marathi news)

असे मिळणार मानधन

सध्याच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजारांपर्यंत आहे, तेथील सरपंचांना आता सहा हजार, तर उपसरंपचांना दोन हजार रुपये मानधन मिळेल. दोन ते आठ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आठ हजार तर उपसरपंचांना तीन हजार रुपये मानधन मिळेल. तर आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दहा हजार, तर उपसरपंचांना चार हजार रुपये मानधन मिळणार आहे.

"यापूर्वी २०१९ मध्येही सरपंचांचे मानधन वाढविले होते. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून मानधनवाढ करत सरपंचांना दिलासा दिला आहे. या माध्यमातून सरपंच-उपसरपंचांच्या सामाजिक कामाला व गावांच्या विकासाला अजून गती मिळेल."

- समीर समदडिया, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT