नांदगाव : छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हीटी असलेल्या तलवाडे घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्याची झळ आज प्रवाशांना बसली. मालेगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घाट बंद असल्याचे कारण सांगत नांदगाव बसस्थानकात उतरवून देण्यात आल्याची घटना आज घडली. विशेष म्हणजे वाहकाने या प्रवाशांना अधिकृत तलवाडे येथे उतरण्यासाठीचे तिकीट दिले होते, तिकीट काढूनही बसमधून खाली उतरण्याचा मनस्ताप या प्रवाशांना सोसावा लागला.
विशेष म्हणजे त्यात काही महिला प्रवाशी देखील होत्या. आगारातील व्यवस्थापन कर्मचाऱ्यात एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे जातेगाव येथून वाकला येथे येऊन तलवाडे येथून फिरून पुन्हा लोणी शिऊर बंगलामार्गे जायचे कि बोलठाण येथून जायचे याबाबतीत संधिग्धता असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्रत्ययदर्शी प्रवाशांचे म्हणणे आहे. (Nashik Due to lack of coordination in ST passengers Talwade news)
नांदगावच्या सीमेवर असलेला वैजापूर तालुक्यातील घाट उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. शिऊर बंगला ते नांदगाव मालेगाव मनमाड मार्गावर असलेली अवजड वाहतूक वळविण्यात आली, मात्र छत्रपती संभाजीनगर जालना भागात जाणारी बससेवा महामंडळाच्या परिवहन विभागाच्या नांदगाव येथील आगाराने जातेगाव बोलठाणमार्गे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. (latest marathi news)
अर्थात हा निर्णय घेताना बस घेऊन जाणाऱ्या चालकाने कुठल्या मार्गाने या बस न्याव्यात याबाबतीत स्पष्टता नसल्याने गोंधळात भर पडत आहे. आज सकाळी मालेगाव येथून तलवाडे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी तिकीट काढले. नांदगाव येताच त्यांना तलवाडे येथे गाडी जाणार नाही म्हणून उतरवून देण्यात आले. गाडी लोणीमार्गे जाणारा असल्याने तुम्ही तेथे उतरून घ्या असे त्यांना सांगण्यात आले, मात्र आम्ही आमच्या गावी कसे जाणार असे या महिलांनी विचारतात तोवर आलेली गाडी निघून गेली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.