Rainwater accumulated on the road leading to the camp at Malegaon. esakal
नाशिक

Nashik Monsoon News : गटारींअभावी रस्त्यांवर पाणीच पाणी! मालेगावातील समस्या

Nashik News : शहरात पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी साचत आहे. पाणी निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने ही समस्या उद्भवत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरात पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी साचत आहे. पाणी निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. साचलेल्या पाण्यामुळे व्यावसायिक वाहनचालक त्रस्त झाले आहे. शहरात प्रमुख रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत, महापालिकेतर्फे जुन्या आग्रा महामार्गावर दोन्ही बाजूने मोठी गटार बनविली आहे. (Due to lack of sewers rainwater is on road Problem in Malegaon)

तरीही जुना-आग्रा महामार्गावर सुपर मार्केट, पिवळापंप, शासकीय विश्रामगृह, वेलनेस सेंटर, ठाकरे हॉस्पिटल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ व कॅम्प भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. कॅम्प रस्त्यावरच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते.

शुक्रवारी येथे जनावरांचा बाजार भरतो तसेच बाजार समितीत धान्य बाजार, भाजीपाला बाजार आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव येतात. साचलेल्या पाण्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी, सायकल चालक, शेतकरी, व्यापाऱ्यांना वाट काढावी लागते. बाजार समितीबाहेर शेतीसाठी लागणाऱ्या बि-बियाण्यांची शेकडो दुकाने आहेत.

पुढे रोटरी आय हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी असते. येथील धान्य गोदाम परिसरातही खड्डे असल्याने या भागातही पाणी असते. या कोणत्याही भागात भूमिगत गटार नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर येते. थोडा पाऊस पडला तरी पावसाळ्याचे चार महिने रस्त्यावर पाणीच पाणी राहते. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढत आहे. (latest marathi news)

साचलेल्या पाण्यातून दुर्गंधीयुक्त वास येतो. येथे अनेक दुकानदारांना या पाण्याचा वासाचा सामना करावा लागतो. पाण्यामुळे त्याचा फटका दुकानदारांना बसतो. महापालिकेने येथे पाणी निचऱ्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी व्यावसायिक व नागरिक करीत आहे.

"रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने त्यातून जावे कसे असा प्रश्न पडतो. कडेने पायी गेले तरी रिक्षाचालक भरकन जात असल्याने अंगावर शिंतोडेही उडतात, त्यातून थेट कपडे माखन्याचे प्रकार घडले आहेत. दुकानांसमोर पाणी साचल्याने अनेकदा ग्राहक येण्यास धजावत नाही. महापालिकेने याप्रश्नी कामयचा तोडगा काढावा." - रामदास बोरसे, अध्यक्ष, नागरी सुविधा समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT