Due to rain Central Railway traffic is disrupted (file photo) esakal
नाशिक

Central Railway : पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित! मनमाडला प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : मुंबई परिसरासह राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबईला येणारे आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या दोन ते पाच तासांच्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. (Due to rain Central Railway traffic is disrupted)

मंगळवारी (ता. ९) मनमाड जंक्शन स्थानकातून नेहमीप्रमाणे मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, धुळे- मनमाड- मुंबई समर स्पेशल यांसह सर्वच गाड्या वेळेवर मार्गस्थ झाल्या. मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना मात्र आज कमालीचा विलंब होत असल्याचे दिसून आले. मुंबईत झालेल्या धुवाधार पावसानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईकडची वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

पण ती संथगतीने आहे. सर्व गाड्या धावत आहेत. मात्र गेली दोन दिवस अनेक गाड्या अडकून पडल्यामुळे काही गाड्या खोळंबल्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. या सर्व परिस्थितीमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईहून परप्रांतात जाणाऱ्या अनेक गाड्या, प्रवासी गाड्यांना तिथून सुटण्यास विलंब होत असल्याने काही गाड्या दहा ते १२ तासांच्या विलंबाने धावत होत्या.

विलंबाने धावत असलेल्या गाड्या

गोरखपूर-कुर्ला एक्स्प्रेस पाच तास, कुर्ला- पाटलीपुत्र एक्स्प्रेस दहा तास, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल १२ तास, मुंबई- वाराणसी महानगरी एक्स्प्रेस नऊ तास, तर जम्मू-तावी पुणे जलम एक्स्प्रेस दोन तासांच्या विलंबाने धावत होती. तसेच गाडी क्र. १७६१८ नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस एक तास ४० मिनिटे, गाडी क्र. २२५३७ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस एक तास २० मिनिटे. (latest marathi news)

गाडी क्र. ११०५८ अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस एक तास ५० मिनिटे, गाडी क्र. १२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस तीन तास ३० मिनिटे, गाडी क्र. १८०३० शालिमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस चार तास ४० मिनिटे, गाडी क्र. १२५३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस तीन तास ३५ मिनिटे, गाडी क्र. १२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस एक तास १५ मिनिटे.

एरलाकुलम- हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस एक तास ५० मिनिटे, गाडी क्र. १२१३० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस तीन तास ४५ मिनिटे, गाडी क्र. ११०७८ जम्मूतावी- पुणे झेलम एक्स्प्रेस एक तास ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याने मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवासी खोळंबून असल्याचे चित्र आज दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT