water of Mahalungi River towards Bhojapur Dam esakal
नाशिक

Nashik Monsoon : पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे म्हाळुंगी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ

प्रकाश शेळके

सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून चांगल्या प्रकारे वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या म्हाळुंगी नदीचे पाणी भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत आहे. मंगळवार व बुधवार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे डोंगरदऱ्यातील सर्वच बंधारे व नद्या भरल्यामुळे सदरचे पाणी आता भोजापुर धरणाकडे प्रवाहित होत आहे. (rains in western side Mahalungi river water increase to large extent)

दोन ते अडीच महिन्यापासून भोजापुर धरणात फक्त मृत साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे यावरती अवलंबून असलेल्या पाच गाव सोळा गाव पाणीपुरवठा योजना शेवटच्या टप्प्यात येऊन थांबल्या होत्या मात्र आता सुरू झालेल्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून अशाच प्रकारे पश्चिम पट्ट्यांमध्ये पाऊस सुरू राहिल्यास आठ ते दहा दिवसांमध्ये भोजापुर धरण उसळून वाहील असा अंदाज आहे. (latest marathi news)

शेतकरी वर्गामध्ये पूर्णता नाराजीचे सूर उमटले होते पण बुधवारी रात्री भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून या परिसरामधील शेतकरी वर्ग पूर्ण नाराज झाला होता कारण या भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आज सकाळी मोठ्या प्रमाणावरती भोजापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

या भागामध्ये यावर्षी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन सारखे पीक घेतलेले असून ती वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता तीन ते चार दिवसापासून थोड्या कमी प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचा वातावरण आहे. भोजापुर धरणामध्ये येणारे पाणी त्यामुळे आता शेतकरी वर्गांना वरदान ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT