Nashik Flower Market : मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच नाशिकचा पारा चाळीशीपर्यंत पोचला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने भाजीपाल्यासह फुलांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. आवक घटल्याने सध्या गोदाघाटावर भरणारा पारंपारिक फूल बाजारही कोमेजला आहे. आवक घटल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत तेजीचे वातावरण आहे. शहराची नाशिक ही ओळख होण्यापूर्वी या शहराचे नाव गुलशनाबाद होते. (nashik due to scorching summer prices of all flowers increased marathi news)
शहर परिसरातील अनेक गावांत इतर पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाई. आजही शहरासह परिसरातील निफाड, दिंडोरी तालुक्यांत फुलांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील गुलाबाची कीर्ती सातासमुद्रापार गेल्याने त्याची युरोपसह अन्य देशांत निर्यातही होते. फुलांच्या वाढीसाठी परिसरात पोषक वातावरणही आहे. त्यामुळे अद्यापही फूल बाजाराचे महत्त्व अबाधित आहे.
कधीकाळी सराफ बाजार भरणारा फूल बाजार तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने गणेशवाडी, गंगाघाट या भागात सरकला. मात्र त्यानंतर मर्यादित असलेला हा बाजार दुप्पट तिप्पट झाला आहे. या बाजारातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. सुरवातीला मर्यादित स्वरूपात असलेला हा बाजार आता चांगलाच फोफावला आहे. बाजारात गुलाबापासून सर्वच प्रकारची फुले उपलब्ध होतात.
त्यामुळे खरेदीसाठी भल्या पहाटेपासून गर्दी उसळते. लग्नसराईच्या काळात या गर्दीत मोठी वाढ होते. या काळात गुलाबाच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते. मात्र उन्हाच्या तडाख्याने हा बाजार उन्हाच्या तीव्रतेने कोमेजला आहे. त्यामुळे एरवी ५० साठ रूपयांत उपलब्ध होणारी झेंडूच्या कॅरेटसाठी एकशेवीस ते दीडशे रुपये मोजावे लागत आहे. लिलीसह जरबेरा व अन्य फुलांची आवकही मंदावली आहे. (latest marathi news)
नाही म्हणायला गेलडाची मुबलक उपलब्धता आहे, परंतु या फुलांना फारशी मागणी नाही. पांढरी बिजली, पिवळी बिजली, मखमल, अस्टर, पिवळी व पांढरी शेवंती, गुलाब, गुलछडी यांच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फुलांच्या हाराच्या किमतीतही दुप्पट वाढ झाली आहे.
बेलही महागला
या महिन्याच्या सुरवातीला महाशिवरात्र होती. या काळात बेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. दोन पैसे पदरात पडत असल्याने आदिवासी मैलोनमैल भटकंती करून बेलाची झाडे शोधतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बेलाची पाने तोडली जात असल्याने बेलाच्या झाडांवर फारशी पाने नाहीत. त्यामुळे दुर्मिळ झालेल्या बेलाच्या वाट्यासाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत.
फुलांच्या मागणीत होणार वाढ
पुढील महिन्यात गुढीपाडवा, श्रीराम जन्मोत्सव आहे. याच काळात लग्नतिथीचे मुहूर्तही आहेत. त्यामुळे फुलांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र आवक घटल्याने पावसाळ्यापर्यंत म्हणजे जून जुलैपर्यंत फुलांचे भाव चढेच राहतील, असे फूल व्यावसायिकांनी सांगितले.
''सध्या कडक उन्हामुळे फुलांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे एरवी वीस तीस रूपयांत विक्री होणाऱ्या हारांच्या किमतीतही वाढ करावी लागत आहे. परंतु ग्राहकांकडून मात्र नेहमीच्याच दरांत हारांची मागणी होते.''- ताराबाई ताजणे, फूल विक्रेता
''फुलांच्या उत्पादनाचा खर्चात मोठी वाढ झाली आहे. परंतु त्या तुलनेत अपेक्षित भाव मिळत नाही, त्यामुळे फुलशेती फायद्याची राहिलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी फूल शेतीकडून अन्य पिकांकडे वळले आहेत.''- मच्छिंद्र आडके, फूल उत्पादक, नागापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.