Nashik Fire Department esakal
नाशिक

Nashik News : अग्निशामक विभागास वर्षभरात 1400 ‘फोन कॉल’!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अग्निशामक विभाग आपत्कालीन विभागांमध्ये मोडत असल्याने विविध बचाव कार्यासह इतर कामांसाठी त्यांना नागरिकांचे फोन कॉल येत असतात. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ आर्थिक वर्षात अग्निशामक विभागास १ हजार ४०० कॉल आले आहेत. आग लागण्याच्या घटनांपासून ते खोटे कॉलपर्यंत अशा सर्व कॉलचा यात समावेश आहे. (During financial year from April 2023 to March 2024 fire department received 1 thousand 400 calls)

अग्निशामक विभाग २४ तास कार्यतप्तर असते. दैनंदिन कुठल्या ना कुठल्या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असते. सर्वप्रथम अग्निशामक केंद्रास पाचारण केले जाते. त्यासाठी त्यांना टेलिफोनच्या मार्फत संपर्क साधला जाता. आग लागणे, पक्षी अडकणे, झाड पडणे, धोकादायक घर- वाडे कोसळणे, खोडसाळपणा म्हणून खोटे कॉल करणे इतर विविध प्रकारचे कॉल दैनंदिन येत असतात.

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ आर्थिक वर्षाचा विचार केला तर अग्निशामक विभागास १ हजार ४०० कॉल आले आहेत. यात सर्वाधिक २८० कॉल वृक्ष कोसळण्याचे त्यापाठोपाठ १४९ पक्षी अडकण्याचे तसेच कचरा पेटणे, पावसाळ्यात रस्ते रस्त्याची स्वच्छता करणे असे विविध २६२ छोटे कॉल आणि इतर ४५८ कॉलचा समावेश आहे.

आकडेवारीचा विचार लक्षात घेता आगीच्या घटनांपेक्षा इतरच कॉल अग्निशामक विभागास अधिक प्रमाणात येत असतात. तर काही जण खोडसाळपणा करत निनावी कॉल करत विनाकारण चौकशी करत अग्निशामक विभागाचा वेळ घालवत असतात. अशा वेळेस कुठे दुर्घटना घडल्यास त्यांच्याकडून अग्निशामक विभागात संपर्क करत असताना फोन व्यस्त येत असल्याचे प्रकार घडत असतात. (latest marathi news)

अशा वेळेस अग्निशामक विभागास उशिराने माहिती मिळते. त्यांना घटनास्थळी दाखल होण्यास विलंब होतो. त्यातून नागरिक विनाकारण अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाद घालत असतात. विभागास आलेल्या एकूण कॉलचा विचार करता जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक १७९ कॉल आले. त्या पाठोपाठ फेब्रुवारी २०२४ मध्ये १५९ तर एप्रिल २०२३ मध्ये १४७ कॉल आले आहे. सर्वाधिक कमी डिसेंबर २०२३ महिन्यात केवळ ७३ कॉल अग्निशामक विभागास आल्याची माहिती विभागाकडून प्राप्त झाली.

वर्षभरात तीन खोटे कॉल

अग्निशामक विभागास एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ आर्थिक वर्षात तीन खोटे कॉल आल्याची माहितीही देण्यात आली. एप्रिल २०२३ मध्ये १ तर जुलै २०२३ महिन्यात २ असे वर्षभरात तीन खोटे कॉल अग्निशामक विभागास आले आहे. याव्यतिरिक्त टाइमपास करणारे दैनंदिन अनेक कॉल येत असल्याने अशा प्रकारचे कॉल अग्निशामक विभागाची डोकेदुखी ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT