Queue of women in front of the Setu office to get income Income Certificate
Queue of women in front of the Setu office to get income Income Certificate esakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी लावल्या रांगा; उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्रांसाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा,

पिंपळगाव बसवंत : महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना अस्तित्वात आणली आहे. महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेल्या या योजनेत पात्र होण्यासाठी उत्पन्नाचा दाखल आवश्‍यक आहे. (Ladki Bahin Yojana)

तो मिळविण्यासाठी दोन दिवसापासून निफाड तालुक्यातील लाडक्या बहिणींनी गावातील तलाठी व सेतू कार्यालयासमोर रांगा लावल्या आहेत. दाखल्यांची अचानक मागणी वाढल्याने महसूल यंत्रणेवर ताण आला आहे. त्यात दाखल्यासाठी लागणारे सर्व्हर कासवगतीने सुरू असल्याने लाडकी बहीणसाठी महिलांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अधिवेशनात जाहीर केली. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

त्यासाठी लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. उत्पन्नाचा दाखला तलाठी किंवा सेतू कार्यालयातून तहसिल कार्यालयाकडे पाठविला जातो. निफाड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये तलाठी व सेतू कार्यालयासमोर भलीमोठी रांग लागल्याचे चित्र दिसत आहे. (latest marathi news)

अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असताना त्या झेलत महिला रांगेत उभ्या दिसल्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी आधीच गर्दी असते. त्यात लाडकी बहिण योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची भर पडली आहे. परिणामी महसूल यंत्रणेवर ताण पडला आहे.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीचे संकेतस्थळ सध्या कासवगतीने काम करीत आहे. महिन्याकाठी दीड हजार रुपये पदरी पडावेत म्हणून भावी लाडक्या बहिणींना कागदपत्रांच्या अडथळ्याच्या शर्यतीतून जावे लागत आहे. निफाड तालुक्यात सुमारे एक लाख महिला लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी होऊ शकतात, असा अंदाज आहे.

"महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण ही योजना महिलांसाठी आधार ठरणार आहे. या योजनेत निफाड तालुक्यातील सर्व पात्र महिलांनी सहभागी व्हावे. यासाठी महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत." - आमदार दिलीप बनकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT