Nashik ZP News esakal
नाशिक

Nashik ZP News : विभागीय आयुक्त आज जि. प. शिक्षणाचा घेणार आढावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम गुरुवारी (ता. २५) जिल्हा परिषदेत येत आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांच्या शालेय आरोग्य तपासणीबाबत ते शिक्षण विभागाची बैठक घेतील. सकाळी अकराला जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षण विभागाची बैठक होईल. (Education department meeting of Zilla Parishad is today )

विभागीय आयुक्त गेडाम यांनी यापूर्वी शिक्षण विभागाची बैठक घेतली होती. त्या वेळी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. आरोग्य तपासणीत आजारी किंवा दिव्यांगत्व आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. (latest marathi news)

या मोहिमेचा आढावा बैठकीत घेण्यात येईल. या बैठकीत प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा रुग्णालय, महिला व बालकल्याण विभाग, अंगणवाडी, माध्यमिक शिक्षण विभाग यांचा मेळ विभागीय आयुक्त घालणार आहेत. गेल्या वेळी दिलेल्या सूचनांवर काय कार्यवाही केली, तसेच येत्या काळात विविध विभागांमध्ये काय नावीन्यपूर्ण करता येऊ शकेल, यासाठी ही बैठक घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT