Procession of the newly elected MP Bhaskar Bhagare on a bullock cart in yeola  esakal
नाशिक

Assembly Election : विधानसभा निवडणुकीत हेच वारे कायम राहतील! खासदार भगरेंचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात मतदारांच्या मनात तीव्र भावना आहेत. याचे पडसाद लोकसभा निकालात दिसले असून, विधानसभा निवडणुकीलाही हेच वारे कायम राहतील, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा पट्ट्यातील खासदारांसह सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Efforts will be made to lift onion export ban under leadership of NCP president Sharad Pawar)

येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲड. माणिकराव शिंदे, शहरप्रमुख योगेश सोनवणे आदी उपस्थित होते. कांदा निर्यातबंदी, कांद्यावर लावण्यात आलेले ४० टक्के निर्यातशुल्क मागे घेण्याची मागणी आपण करणार असल्याचे सांगून मुक्तिभूमी येथील प्रश्नाबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जलजीवनच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करत संबंधित ग्रामपंचायतींनी कामाच्या दर्जाबाबत जागरूक राहून चांगले काम करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीत उभा करण्यात आलेल्या डमी उमेदवाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

- गावोगावी स्वागत

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर प्रथमच ते तालुका दौऱ्यावर आले होते. त्यांच्या आभार दौऱ्यात तालुक्यातील पाटोदा, मुखेड, विखरणी, अंदरसूल, नगरसूल, सायगाव तसेच येवला शहरात ठिकठिकाणी त्यांचा सत्कार झाला. विखरणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार भास्कर भगरे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, शिवसेना नेते संभाजी पवार, लासलगावचे माजी सरपंच जयदत्त होळकर, रयत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुजित गुंजाळ, बाजार समितीचे संचालक संजय बनकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शाहूराजे शिंदे, शिवा सुरासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शेलार.

शहराध्यक्ष योगेश सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष संजय कासार, सुभाष निकम, महेंद्र पगारे, अरविंद शिंदे, आलममीर शेख, अजीज शेख, आलमगीर शहा, निसार शेख, अकबर शहा, रिजवान शेख, झुंजार देशमुख, अक्षय तांदळे, अमित अनकाईकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT