nashik sakal
नाशिक

Nashik : आठ टक्के शतकमहोत्सवी भेट, पाच टक्के लाभांश

जिल्हा सरकारी कर्मचारी बॅंकेतर्फे दिवाळी भेट, अध्यक्ष भालेराव यांची वार्षिक सभेत घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्हा सरकारी कर्मचारी बॅक संस्थेच्या सभासदांना एक कोटी ३१ लाख ७५ हजार रूपये शतक महोत्सवी निधीतून भागभांडवलाच्या प्रमाणात आठ टक्के शतक महोत्सवी भेट व पाच टक्के लाभांश देण्याची घोषणा बॅकेचे अध्यक्ष शिरीष भालेराव यांनी केली. दिवाळी गोड करणाऱ्या या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले आहे.

सरकारी कर्मचारी बॅकेची एकशे एकवी वार्षिक सर्वसाधारण सभा आॅनलाईन झाली. बॅकेचे ज्येष्ठ सभासद रमेश राख, महेश आव्हाड, एन. डी. सानप, उत्तमराव देशमाने, अशोक गुळेचा प्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष भालेराव प्रास्ताविकात म्हणाले, कर्जाचा व्याजदर १३ वरून ११.५ टक्के आणला आहे. सरकारी कर्जरोखे खरेदी विक्रीतून नफा मिळवत असल्याने संस्थेची प्रगतीचा आलेख उंचावत आहे. वाजवी दरात गृहकर्ज सुविधा सुरू करणार आहे. कर्जदार सभासदांसाठी पूर्ण रक्कमेला सुरक्षाकवच म्हणून कर्जदार सभासद कुटुंब आधार योजना सुरू करण्यात येणार आहे.

विविध विषयांना मान्यता

शतक महोत्सवी भेट व लाभांशाची घोषणा अध्यक्ष भालेराव यांनी करताच टाळ्याच्या गजरात सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. कुटुंब आधार योजनेचे सभासदांनी स्वागत केले. यासह वार्षिक अंदाजपत्रक, नफा वाटणी, वैधानिक लेखापरिक्षणाचा अहवाल, पोटनियम दुरूस्ती अशा विषयांना सभासदांनी मान्यता दिली. कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची मागणी काही सभासदांनी केली.

सभेला जी. पी. खैरनार, उत्तम गांगुर्डे, वसंत मुंगीकर, राजेद्र बैरागी, अजय कस्तुरे, प्रकाश थेटे, श्रीरंग दीक्षित, ज्ञानेश्‍वर गायकवाड, संजय पाटे, संतोष कुंभारे, मधुकर आढाव, संदीप दराडे, संतोष खालकर, श्रीकांत आहीरे, गफुर मिर्झा, अकुंश जगदाळे, रमेश बोडके, राजू शिरसाठ, योगेश शिंदे, सतीश गणगे, श्रीकृष्ण पोतदार, दत्तात्रय झाल्टे आदींसह पाचशे सभासदांनी सभेला उपस्थिती लावली.

उपाध्यक्ष दिलीप सलादे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, दिलीप थेटे, दीपक आहीरे, प्रवीण भाबड, अजित आव्हाड, अशोक शिंदे, सुभाष पगारे, संदीप पाटील, महेश मुळे, सुनील गीते, प्रशांत गोवर्धने, मंगेश पवार, प्रशांत कवडे, मंदाकिनी पवार, धनश्री कापडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पाटील, व्यवस्थापक आण्णासाहेब बडाख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT